ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: May 18, 2017 03:18 PM IST

ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं निधन

18 मे : ज्येष्ठ अभिनेत्री रीमा लागू यांचं आज आकस्मिक निधन झालं. त्या 59 वर्षांच्या होत्या. त्यांच्या पश्चात मुलगी मृण्मयी आणि जावई विनय वायकुळ हे आहेत.

काल रात्री छातीत दुखू लागल्यानं त्यांना कोकिला बेन रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्यावर आज (गुरूवारी) दुपारी ओशिवरा येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

रीमा लागू याचं लग्ना आधीचं नाव नयन भडभडे होतं. त्या मंदाकिनी भडभडे यांची मुलगी. त्यामुळे घरातूनच त्यांना अभिनयाचे धडे मिळाले.

शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर मराठी रंगभूमीपासून सुरुवात करणाऱ्या रिमा लागू यांनी अनेक मराठी, हिंदी चित्रपट, मालिका आणि नाटकांमध्ये काम केलं होतं. मराठीसह अनेक हिंदी चित्रपटातूनही त्यांनी स्टार्सच्या आईची भूमिका साकारली. आपल्या कसदार अभिनयाच्या जोरावर त्यांनी चित्रपटसृष्टीत आपलं स्वतःच अढळ स्थान निर्माण केलं होतं.

राजश्री प्रॉडक्शनच्या बहुतेक चित्रपटांमध्ये त्यांनी काम केले होते. 'मैने प्यार किया', 'हम आपके हैं कौन', 'हम साथ साथ है', 'वास्तव', 'साजन', 'कुछ कुछ होता है', 'आशिकी', 'आई शप्पथ', 'बिंधास्त', 'जाऊ द्या ना बाळासाहेब', 'सातच्या आत घरात', 'मुक्ता' यांसारख्या असंख्य मराठी आणि हिंदी चित्रपटांमध्ये त्यांनी भूमिका साकारल्या. त्यांना ‘मैने प्यार किया', 'आशिकी', 'हम आपके है कौन'आणि 'वास्तव' या चित्रपटांतील भूमिकेसाठी फिल्मेफेअरमध्ये सहाय्यक अभिनेत्रीच्या पुरस्कारासाठी नामांकन मिळाले होते.

Loading...

त्यांच्या या अाकस्मिक निधनामुळे चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली आहे. रिमा लागूंच्या जाण्याने एका अर्थाने बॉलिवूडची ग्लॅमरस आईच काळाच्या पडद्याआड गेलीय असंच म्हणावं लागेल.

 

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: May 18, 2017 08:12 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...