मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

महाराष्ट्र मालकीचा असल्यासारखं का वागताय? कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

महाराष्ट्र मालकीचा असल्यासारखं का वागताय? कंगनाचा मुख्यमंत्र्यांवर हल्लाबोल

अवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.

अवैध बांधकाम प्रकरणी बीएमसीने कंगनाला एका महिन्याची मुदत दिली आहे.

' मुख्यमंत्री ठाकरे हे देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? तुम्ही आज जनतेचे सेवक आहात'

  • Published by:  sachin Salve
मुंबई, 26 ऑक्टोबर : शिवसेना (Shivsena) आणि अभिनेती कंगना रणौत (Kangana Ranaut) यांच्यात वादाचा नवा अंक सुरू झाला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackery) यांनी दसरा मेळाव्याच्या भाषणात भाजप आणि कंगना रणौतवर सडकून टीका केली होती. मुख्यमंत्र्यांच्या या टीकेला आता कंगनाने आपल्या शैलीत उत्तर दिले आहे. मुख्यमंत्री, स्वत: ला लाज वाटली पाहिजे. तुम्ही जनतेचे सेवक आहात आणि तुम्ही या क्षुल्लक गोष्टींवरून वाद घालत आहात. तुमच्याकडे असलेल्या सत्तेचा वापर हा इतरांना अपमानीत करण्यासाठी आणि हानी पोहोचवण्यासाठी करत आहात. घाणरेडं राजकारण करून मिळवलेल्या खुर्चीसाठी तुम्ही पात्र नाही. तुम्हाला लाज वाटायला हवी, अशी विखारी टीका कंगनाने थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंवर केली. तसंच, मुख्यमंत्री ठाकरे हे देशाला विभागण्याचा प्रयत्न करत आहे. त्यांना महाराष्ट्राचा ठेकेदार कुणी बनवलं? तुम्ही आज जनतेचे सेवक आहात, याच्या आधी कुणीतही होता. तुमच्यानंतर या खुर्चीवर कुणी तरी बसेल. पण तुम्ही महाराष्ट्र स्वत: च्या मालकीचा असल्यासारखं का वागतात? असा सवालही कंगनाने विचारला. हिमालयातलं सौंदर्य हे प्रत्येक भारतीयांसाठी आहे. तिथे मिळणारी संधीही भारतातील जनतेसाठीच आहे. उद्धव ठाकरे यांनी आम्हाला लोकशाहीने दिलेला अधिकार हिरावून घेण्याचा प्रयत्न करू नये. तुमची गलिच्छ भाषणे तुमची अकार्यक्षमता दाखवते, असं म्हणत कंगनाने मुख्यमंत्र्यांवर टीका केली. काय म्हणाले होते मुख्यमंत्री ठाकरे? मुंबईला पाकव्याप्त काश्मीर म्हणणे हे जर देशात असेल तर पीएम यांचे पाप, आमचे पाप नाही. एकाने आत्महत्या केल्यानंतर बिहार पूत्र गेला म्हणून गळे काढले जात आहेत. गळे काढणारे महाराष्ट्र सरकार, ठाकरे कुटुंबीय, आदित्य यावर आरोप केले, गोमूत्र शेणाने गुळण्या केल्या नंतर काय झालं. घरी खायला मिळत नाही म्हणून मुंबईत यायचं  इथं अनधिकृत बांधकामं करायची. मुंबईशी नमकहरामी करायची, हिंमत असेल तर पाकव्यात सोडा, काश्मीरमध्ये  भागात जाऊन अधिकृत बांधून दाखवा, असं म्हणत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कंगना रणौतवर निशाणा साधला.
First published:

पुढील बातम्या