ही मराठमोळी अभिनेत्री म्हणाली, तुम्ही फक्त ट्रेलर पाहिले आता मुव्ही सुरू झालीय..

ही मराठमोळी अभिनेत्री म्हणाली, तुम्ही फक्त ट्रेलर पाहिले आता मुव्ही सुरू झालीय..

बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण ईशा निवडणूक लढवणार नसून ती भाजपचा प्रचार करणार आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑगस्ट- बॉलिवूडमधली मराठमोळी अभिनेत्री ईशा कोप्पीकर विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात उतरणार आहे. पण ईशा निवडणूक लढवणार नसून ती भाजपचा प्रचार करणार आहे. आता कुठे राजकारणात माझा जन्म झाला आहे. नेमकं राजकारण काय असतं, हे समजून घेण्यासाठी मला ग्राउंड वर्क करायचे आहे. त्यामुळे निवडणूक लढण्याची माझी इच्छा नाही. मात्र आगामी विधानसभा निवडणुकीत पक्षाचा प्रचार करणार असल्याचे ईशाने 'न्यूज 18 हिंदी'ला दिलेल्या एक्सक्लुसिव्ह इंटरव्ह्युमध्ये सांगितले.

ईशा कोप्पीकर मागील काही दिवसांत रुपेरी पडद्यावर झळकली नसली तरी ती पडद्यामागे प्रचंड एक्टिव्ह आहे. ईशाने याच वर्षी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या उपस्थितीत ईशाने भाजपचे 'कमळ' हातात घेतले होते. ईशाने आता राजकारणात पाऊल ठेवले आहे. सध्या ती ब्रॅंड एंडोर्समेंटशी संबंधित अनेक इव्हेट्समध्ये दिसत आहे. ईशा सिन सिटीचा 'क्लोदिंग ब्रॅंड' लाँच करण्यासाठी पोहोचली होती. तिथे तिने 'न्यूज 18 हिंदी' शी संवाद साधला. ईशाने यावेळी राजकारण आणि फिल्मी करियरवर दिलखुलास गप्पा मारल्या. मुलगी लहान असल्यामुळे सिनेमापासून लांब असल्याचे तिने सांगितले. परंतु, ती लवकरच रुपेरी पडद्यावर पुनरागमन करणार आहे. फॅमिलीसोबत ती बिझनेसही संभाळत आहे.

पहिले पाच वर्षे तुम्ही फक्त ट्रेलर पाहिले आता मुव्ही सुरू झाली आहे..

ईशाने आता भाजपच्या प्रचाराचे काम सुरू केले आहे. भाजपचे उत्तम पद्धतीने सुरू आहे. पहिले पाच वर्षे तुम्ही फक्त ट्रेलर पाहिले अब मुव्ही सुरू झाली असल्याचे ईशाने सांगितले. काश्मीरमधील कलम 370 रद्द करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भारताचे नाव संपूर्ण जगात उज्ज्वल केले आहे. देशातील महिलांनी आणखी सक्षम व्हावे, अशी नरेंद्र मोदी यांची मनीषा आहे. महिलांसाठी अनेक योजना नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात आल्याचे ईशाने सांगितले.

'कशी मी जाऊ मथुरेच्या बाजारी...', चिमुकल्या गवळणीचा VIDEO VIRAL

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Aug 23, 2019 03:08 PM IST

ताज्या बातम्या