Home /News /mumbai /

अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागण

अभिनेते दिलीप कुमार यांच्या दोन्ही भावांना कोरोनाची लागण

या आधीही बॉलिवूडमधल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे.

    मुंबई 16 ऑगस्ट: अभिनेते दिलीप कुमार यांचे बंधू अहसान खान आणि असलम खान यांना कोरोनाची लागण झाली आहे. शनिवारी रात्री त्यांना लिलावती हॉस्पिटलमध्ये भरती करण्यात आलं होतं. त्यांचे रिपोर्ट्स पॉझिटिव्ह आल्याने डॉक्टरांनी कोरोना उपचारांना सुरुवात केली आहे. डॉक्टर जलील पारकर आणि डॉ. निखिल गोखले हे त्यांच्यावर उपचार करत आहेत. 97 वर्षांच्या दिलीप कुमार यांच्या या भावांचं वयही जास्त आहे. त्यामुळे डॉक्टरांनी चिंता व्यक्त केली आहे. त्यांना ह्रदयविकार आणि रक्तदाबाचाही त्रास आहे अशी माहिती डॉ. पारकर यांनी दिली. त्या दोघांनाही अतिदक्षता कक्षात ठेवण्यात आलं असून व्हेंटिलेटरवर ठेवण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. दरम्यान दिलीप कुमार यांच्या पत्नी सायराबानो यांनी असलम आणि अहसान हे लवकरच बरे होऊन घरी परततील अशी आशा व्यक्त केली आहे. या आधीही बॉलिवूडमधल्या अनेकांना कोरोनाची लागण झाली आहे. अमिताभ बच्चन, अभिषेक, ऐश्वर्या या सगळ्यांनाच कोरोनाची लागण झाली होती. मात्र सगळंच बच्चन कुटुंबीय आता पूर्णपणे बरं होऊन घरी परतलं आहे.  करण जोहर यांच्या कार्यालयातल्या काही जणांनाही कोरनाची लागण झाली होती. SSR Death Case : नवी बाजू समोर, पार्थिवाजवळ 'त्या' तरुणाला भेटली 'मिस्ट्री गर्ल' दरम्यान, कोरोनाचं जगभरात थैमान सुरू आहे. भारतात रिकव्हरी रेट चांगला असला तरीही दर दिवसाला कोरोनाचे नवीन रुग्ण सापडण्याचं प्रमाण मात्र जास्त आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून मिळालेल्या माहितीनुसार आतापर्यंत कोरोनाग्रस्तांचा आकडा 25 लाख 89 हजार 682 वर पोहोचला आहे. Tarak Mehta Ka Ooltah Chashmah: मालिकेत होणार या दिग्गज अभिनेत्याची एंट्री 24 तासांत तब्बल 63 हजार 489 नवीन लोकांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले असून 944 रुग्णांचा कोरोनामुळे भारतात मृत्यू झाला आहे. सध्या कोरोनाच्या 6 लाख 77 हजार 444 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. तर आतापर्यंत मृतांचा आकडा 50 हजाराच्या जवळ पोहोचला आहे. गेल्या 24 तासांत 944 रुग्णांचा मृत्यू झाला असून आतापर्यंत एकूण 49,980 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
    Published by:Ajay Kautikwar
    First published:

    पुढील बातम्या