बॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी केली अटक

बॉलिवूड अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी केली अटक

नवी मुंबई पोलिसांकडून अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी एजाज खानला अटक करण्यात आली आहे. एजाज खानने 'रक्त चरित्र' आणि 'या रब' सारखे अनेक बॉलिवूड सिनेमे केले आहे.

  • Share this:

मुंबई, 23 ऑक्टोबर: बॉलिवूड आणि टेलिव्हिजनचा अभिनेता एजाज खानला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली आहे. मंगळवारी सकाळच्या सुमारास नवी मुंबई पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं आणि अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी त्याची चौकशी करण्यात आली आहे.

एजाज खानकडे एकूण आठ टॅबलेट्स सापडल्याचं नवी मुंबईच्या नार्कोटिक्स विभागानं सांगितले आहे.त्याचबरोबर दोन मोबाईल फोन आणि एकूण 2 लाख रुपये जप्त करण्यात आले आहेत.

याआधी एजाज खानला ड्रग्स प्रकरणी अटक करण्यात आली होती. गेल्याच वर्षी नवी मुंबई पोलिसांनी अमली पदार्थ ठेवल्याप्रकरणी त्याच्या रहत्या घरी धाड टाकली होती.

एजाज खानने याआधी 'रक्त चरित्र' आणि 'या रब' सारखे अनेक बॉलिवूड सिनेमे केले आहे. त्याचबरोबर बिग बॉस सिझन-7, कॉमेडी नाईट विथ कपिल, करम अपना अपना, कहानी हमारे महाभारत की आणि रहे तेरा आशीर्वाद अशा कार्यक्रमातसुद्धा काम केलं आहे.

VIDEO: अमृतसर रेल्वे अपघाताची पुनरावृत्ती टळली, थोडक्यात थांबली ट्रेन

 

First Published: Oct 23, 2018 11:36 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading