चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खानला अटक

या आधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला होता. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केली होती.

या आधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला होता. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केली होती.

  • Share this:
    मुंबई 19 एप्रिल: चिथावणीखोर वक्तव्य करत सामाजिक शांतता भंग केल्याप्रकरणी अभिनेता एजाज खान याला मुंबई पोलिसांनी आज अटक केली. फेसबुक लाईव्ह करत त्याने बुधवारी धार्मिक तेढ निर्माण होईल असं वक्तव्य केलं होतं. त्याच्याविरुद्ध तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याची चौकशी केली आणि एजाजला अटक करण्यात आली.  153A,121,117,188,501,504,505(2) या कलमानुसार ही कारवाई करण्यात आली. खार पोलिसांचं एक पथक आज त्याच्या घरी गेलं आणि त्याला अटक केली. सामाजिक शांतता भंग होईल असं कुणीही वक्तव्य करू नये असं सरकारकडून वारंवार सांगितलं जात आहे. मात्र सोशल मीडियावरून सातत्याने अशी प्रक्षोभक वक्तव्य केली जात आहेत. त्यामुळे पोलिसांनी कडक भूमिका घेत कारवाई केली आहे. या आधीही एजाज खान अनेकदा वादात सापडला होता. त्याला पोलिसांनी या आधीही अटक केली होती. काही दिवसांपूर्वी मुख्यमंत्री उद्धऴ ठाकरे यांनी अशा लोकांवर कडक कारवाईचा इशारा दिला होता.  महाराष्ट्रात अडकलेल्या सर्व कामगारांची काळजी आम्ही घेऊ. तुम्ही काळजी करू नका. या गरीबांच्या भावनांशी खेळ करू नका आग भडकविण्याचा प्रयत्न करू नका, असं काम करणाऱ्यांना आम्ही सोडणार नाही असा इशाराही त्यांनी दिला. COVID19: देशातल्या 22 जिल्ह्यांमध्ये 14 दिवसांपासून नवा रुग्ण नाही, पहा यादी कोरोनाच्या लढ्यात पैसे इथून काढा, तिथून काढा असे सूचवत आहेत. पैसे कुठून आणि कसे काढायचे ते आम्हाला कुणी सांगू नये असा टोलाही त्यांनी लगावला. दररोज 6 ते 7 लाख मजुरांना दररोज नाश्ता आणि जेवण देत असल्याचंही त्यांनी सांगितलं होतं. हे वाचा - लॉकडाऊन असतानाच जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी हल्ला, 2 जवान शहीद

    चीनने 190 लाख कोटी द्यावेत'; मुंबईच्या वकिलाची आंतरराष्ट्रीय न्यायालयात याचिका

     
    First published: