एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्यांवर आता होणार कारवाई

एलईडी लाईट व पर्ससीन जाळ्याने मासेमारी करणाऱ्यांवर आता होणार कारवाई

एलईडी लाईट आणि परिस्थितीने संपूर्ण मच्छीमारांचा संसार उद्ध्वस्त तसेच मासेमारी धंद्यावर मोठा परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे

  • Share this:

सोलापूर,18 डिसेंबर:अखिल महाराष्ट्र मच्छिमार कृती समितीचे शिष्टमंडळाने दामोदर तांडेल यांच्या नेतृत्वाखाली मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली. शिष्टमंडळामध्ये कृती समितीचे कार्याध्यक्ष डिमेलो सरचिटणीस संजय कोळी, उपाध्यक्ष अॅड. कमलाकर कांदेकर, युवा अध्यक्ष पुनित तांडेल यांचा समवेत मच्छिमार प्रतिनिधी होते. एलईडी लाईट आणि परिस्थितीने संपूर्ण मच्छीमारांचा संसार उद्ध्वस्त तसेच मासेमारी धंद्यावर मोठा परिणाम होऊन त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांशी यांच्याशी सविस्तर चर्चा करण्यात आली.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे मान्य केले की शासनाने काढलेले दोन जीआर त्याची अंमलबजावणी होत नाही, हे माझ्याही निदर्शनास आले आहे. सरकारने देवेंद्र फडणीस मुख्यमंत्री असताना 5 फेब्रुवारी 2016 ला पर्ससीन मासेमारी करण्यास बंदीचा कायदा केला होता. त्या कायद्यामध्ये 495 मासेमारीला दिलेले परवाने त्वरित रद्द करावेत आणि फक्त पाचशे मीटरची तीसुद्धा कोकणामध्ये पाचशे मीटरच्या जाळीचे मासेमारी 182 फिगर करण्यात आली होती. डहाणूपासून ते मुरुड जंजिरापर्यंत बाराही महिने बंदी असताना ससून डॉक बंदरांमध्ये सातशे बोटी मिरकरवाडा बंदरांमध्ये 400 व सागर आक्षी अलिबाग 300 बोटी असे दीड ते दोन हजार बोटी बेकायदेशीर परवानगी नसताना मासेमारी करत होते. त्याला माजी मत्स्यव्यवसाय मंत्री महादेव जानकर यांचा वरदहस्त होता. आताचे प्रधान सचिव अनुपकुमार मत्स्यव्यवसाय आणि सागरी सहआयुक्त राजेंद्र जाधव यांच्या कोट्यवधी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचे मुख्यमंत्र्यांच्या निदर्शनांस

दामोदर तांडेल यांनी निदर्शनास आणून दिले. त्यानंतर त्यांच्यावरती योग्य कारवाई करावी, या दोन हजार भांडवलदारांच्या अनधिकृत ट्रॉलर चालू आहेत. त्यांच्यावर कायदेशीर कारवाई केली जाईल व एकही बोट किनारपट्टीवर बेकायदेशीर चालू असेल त्यांच्यावर फौजदारी दावे दाखल करणे त्या बोटी जप्त करणे व या पुढे विना परवाना मासेमारी होऊ नये या करता कठोर पावले उचलण्याचे आदेश संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आले, असल्याची माहिती दामोदर तांडेल यांनी दिली आहे.

Published by: Sandip Parolekar
First published: December 18, 2019, 8:16 PM IST
Tags: #Mumbai

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading