अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, मनपाकडून धडक कारवाई

अडीच हजार कोटींच्या बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्यांचा साठा जप्त, मनपाकडून धडक कारवाई

नवी मुंबई महापालिका पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात अॅक्शनमध्ये आल्याचं पाहायला मिळतं आहे. बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर आता महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे.

  • Share this:

नवी मुंबई, 12 मार्च: नवी मुंबई महापालिका पुन्हा एकदा प्लास्टिक पिशव्यांच्या विरोधात अॅक्शनआल्याचं पाहायला मिळतं आहे. बंदी असणाऱ्या प्लास्टिक पिशव्यांची विक्री करणाऱ्यांवर आता महापालिकेने कारवाईचा बडगा उचलला आहे. महापालिका अतिरिक्त आयुक्त सुजाता ढोले (Sujata Dhole) यांनी शहरात बेकायदेशीर पिशव्यांची विक्री करणाऱ्या लोकांवर कारवाईस करण्यास सुरूवात केली आहे. या कारवाईत तुर्भे विभागात मोठ्या प्रमाणात प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणारे गोडाऊन असल्याची माहिती मिळाली. या माहितीच्या आधारावर महापालिका उपायुक्त बाबासाहेब राजळे, विभाग अधिकारी अशोक मढवी, सुबोध ठाणेकर आणि अधिकाऱ्यांच्या पथकाने गोडाऊनवर धाड टाकली.

नवी मुंबई महापालिकेकडून टाकण्यात आलेल्या या धाडीत तब्बल अडीच हजार कोटींचा प्लास्टिक पिशव्यांचा बेकायदेशीर साठा जप्त करण्यात आला आहे. विक्रीस बंदी असणाऱ्या पिशव्यांची बेकायदेशीर विक्री किरकोळ व्यापाऱ्यांना नवी मुंबईतील तुर्भे विभागातूनचहोत असल्याची माहिती यात समोर आली आहे. प्लास्टिक पिशव्यांच्या साठ्यासाठी एपीएमसी मधील बंद गाळ्यांचा वापर गोडाऊन म्हणून करण्यात आला आहे.

(हे वाचा-VIDEO:दिल्ली-NCRमध्ये सकाळपासूनच पावसाची हजेरी, उष्णतेपासून काही प्रमाणात दिलासा)

यापूर्वी शहरातील किरकोळ दुकानदार, फेरीवाले यांच्यावर प्लास्टिक बंदीची कारवाई करून प्रत्येक जणांकडून 5 हजार रुपयांचा दंड देखील आकारला जात आहे. मात्र तरी देखील नवी शहरातील प्लास्टिक पिशव्यांचा वापर शंभर टक्के बंद होताना दिसत नाही. म्हणून महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी बेकायदेशीर प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणाऱ्या विरोधात कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशांच्या आधारावरच शहरातील प्रत्येक विभागात विभाग अधिकाऱ्यांच्या नियंत्रणाखाली विशेष टीम तैनात करण्यात आल्या आहेत. आता या टीमच्या माध्यमातून नवी मुंबई शहर शंभर टक्के प्लास्टिक मुक्त करण्यासाठी मोहीम राबविण्यात आली आहे.

(हे वाचा-Lockdown मुंबईच्या उंबरठ्यावर; या शहरात Night curfew)

कोरोनाचा प्रादुर्भाव सुरू होण्यापूर्वी नवी मुंबईकरांनी स्वयंस्फूर्तीने प्लास्टिक पिशव्यांचा वापर बंद केला होता. मात्र आता पुन्हा नवी मुंबईकर प्लास्टिक पिशव्यांच्या वापराबाबत सजग होताना दिसत नाही. म्हणूनच महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांनी पुन्हा एकदा नवी मुंबई शहर प्लास्टिक मुक्त शहर करण्यासाठी मोहीम हाती घेतलीय. मात्र या मोहिमेत प्लास्टिक पिशव्यांचा वापर करणार्यावर तर होणार आहेच. मात्र प्लास्टिक पिशव्यांचे वितरण करणाऱ्या व्यापाऱ्यांचे पाळेमुळे शोधून कडक कायदेशीर कारवाई करण्यास सुरुवात केलीय..

Published by: Janhavi Bhatkar
First published: March 12, 2021, 10:44 AM IST

ताज्या बातम्या