अॅसिड हल्ला पीडित ललिताचं शुभमंगल

अॅसिड हल्ला पीडित ललिताचं शुभमंगल

रवी शंकर सिंग या तरुणानं चुकून डायल केलेला नंबर तिच्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात ठरला.

  • Share this:

24 मे : लग्न ही प्रत्येकाच्याच आयुष्यातली जीवनाला वळण देणारी घटना. जवळ जवळ सगळेच जण या क्षणाची वाट पाहत असतात. ललिताचं आयुष्य फार काही वेगळं नव्हतं. पण एका अॅसिड हल्ल्यानं होत्याचं नव्हतं झालं. अॅसिड हल्ल्यातील पीडित तरुणीसाठी आयुष्य म्हणजेच शाप होऊन जातं. अशा तरुणींसाठी लग्न तर लांबचीच गोष्ट. पण यूपीतल्या आझमगड ललिता बन्सी या तरुणीच्या आयुष्यात लग्नाचा मंगल क्षण आला. ललिता  मुंबईतल्या दादरमध्ये राहुल शंकर सिंग नावाच्या तरुणाशी विवाहबद्ध झाली.

2012 मध्ये ललिता हिच्यावर अॅसिड हल्ला झाला होता. यात तिच्या चेहऱ्याला जबर जखम झाली. या  हल्ल्यातून ती बचावली. पण तिचा चेहऱ्याची न भरून येणारी हानी झाली होती. अशा अवस्थेत तिच्याशी लग्न शक्य नव्हतं.  पण असं म्हणतात लग्नाच्या गाठी आधीच जुळल्या असतात. ललिताच्या बाबतीतही असंच असावं.  राहुल  या तरुणानं चुकून डायल केलेला नंबर तिच्यासाठी नवीन आयुष्याची सुरुवात ठरला.

राहुल आणि ललिता एकमेकांच्या प्रेमात पडले. राहुल हा मालाडला सीसीटीव्ही आॅपरेटर आहे. राहुल म्हणतो, 'ललिताचा चेहऱ्यानं मला फार काही फरक पडला नाही. ती खूप गोड आहे आणि मला आवडते.'

राहुलनं तिच्या चांगुलपणावर प्रेम केलं. आणि त्यानं लग्नाचा धाडसी निर्णय घेतला. या दोघांचा लग्नसोहळा दादरमध्ये पार पडला. या विवाहसोहळ्याला अभिनेता विवेक ओबेरॉय, आमदार नितेश राणेही उपस्थित होते.विवेक ओबेराॅयनं ट्विट करून दोघांचं कौतुक केलंय.

First published: May 24, 2017, 11:14 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading