मुंबई, 6 जानेवारी : मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना धमकी देणाऱ्याला मुंबई पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. या आरोपीला गुजरात जामनगरमधून ताब्यात घेण्यात आलं असून मुंबई पोलीस पथक उद्या आरोपीसह मुंबईत दाखल होणार आहे. ताब्यात घेण्यात आलेल्या आरोपीच नावं मनोज दोढीया असून तो 20 वर्षाचा आहे. हे कृत्य का केलं याचा शोध मुंबई पोलीस करीत आहेत. तपास अधिकारी पोलीस उपनिरीक्षक विलास तुपे यांच्या पथकाने गुजरात जामनगर मधून या आरोपीला अटक केली आहे.
मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर (Mumbai Mayor Kishori Pednekar ) यांना फोन करून जीवे मारण्याची धमकी दिल्याची धक्कादायक बाब समोर आली होती. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 22 डिसेंबर रोजी महापौर किशोर पेडणेकर यांना एका अज्ञात व्यक्तीचा फोन आला होता. त्याने अर्वाच्च भाषेत शिव्या देऊन जीवे मारण्याची धमकी दिली होती. या धमकीच्या फोनमुळे एकच खळबळ उडाली होती. त्यानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझार मैदान पोलीस स्टेशनमध्ये जाऊन तक्रार दाखल केली होती.
हे ही वाचा-ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; मायकेल जॅक्सनच्या कार्यक्रमाचे करमणूक शुल्क माफ
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, 22 डिसेंबर रोजी संध्याकाळी 6 वाजेच्या सुमारास हा फोन आला होता. समोरील व्यक्ती ही हिंदी भाषेतून बोलत होती. त्याने अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन शिवीगाळ केली होती. या प्रकारानंतर किशोरी पेडणेकर यांनी आझाद मैदान पोलीस स्टेशनमध्ये दोन दिवसांनी तक्रार दाखल केली होती. या प्रकरणाबाबत पोलिसांनी अत्यंत गुप्तता बाळगली होती. हा फोन शेजारील राज्यातून आल्याची माहिती समोर आली होती.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Gujrat