Corona ला रोखण्यासाठी महापौरांची कडक अट; परदेशातून मुंबईत येणाऱ्यांसाठी आता हा नियम अनिवार्य

Corona ला रोखण्यासाठी महापौरांची कडक अट; परदेशातून मुंबईत येणाऱ्यांसाठी आता हा नियम अनिवार्य

मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांबरोबरच पालिकेनेही कंबर कसली आहे

  • Share this:

मुंबई, 19 ऑगस्ट : राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या दिवसेंदिवस वाढत आहे. अशात मुंबई, पुण्यात कोरोना रुग्णांची संख्या कमी करण्यासाठी सरकारकडून प्रयत्न केले जात आहे. मुंबईत कोरोना रुग्णांच्या संख्येत काही प्रमाणात नियंत्रण आणणे शक्य झाले आहे. येत्या काळात ही संख्या वाढू नये म्हणून पालिकेच्या अधिकाऱ्यांकडून अधिक काळजी घेतली जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून विविध सेवा सुरू करण्यात आल्या आहेत. अद्यापदी हॉटेल सेवा सुरू करण्यात आलेली नाही. आजच आलेल्या माहितीनुसार आंतरजिल्हा एसटी सेवा उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे. अशा परिस्थितीत परदेशातून एअर लाइन्सने मुंबई विमानतळावर दाखल होणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कोरोना टेस्ट करण्यात येईल. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी सांगितल्यानुसार परदेशातून मुंबईत दाखल होणाऱ्यांना कोरोना चाचणी करणे अनिवार्य असणार आहे.

दुसरीकडे मुंबईत पोलिसांनी वाहतुकीबाबतचे नियम कडक केले आहेत.  मुंबईत कोरोनाचा उद्रेक वाढत आहे. गर्दी टाळण्यासाठी सरकार अनेक उपाय योजना करत आहे. मात्र गर्दी कमी होत नसल्याने आता पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारलाय. विना परवाना वाहन चालविणाऱ्यांविरुद्ध आणि गरज नसतांनाही वाहन बाहेर काढणाऱ्यांविरुद्ध कारवाई करण्याचा इशारा पोलिसांनी दिला आहे.

फक्त नियम मोडले म्हणून केवळ ही कारवाई होणार नाही तर ती तुमच्या सुरक्षेसाठीही आवश्यक आहे असं पोलिसांनी म्हटलं आहे. मुंबई कोरोनाविरुद्ध महत्त्वाची लढाई लढत आहे. अशा परिस्थितीत सगळ्यांनी नियमांचं पालन करणं गरजेचं आहे असंही पोलिसांनी म्हटलं आहे. पोलीस कारवाई तर करतील पण त्याच बरोबर वाहनही जप्त करतील असा इशारा मुंबई पोलिसांनी दिला आहे. त्यामुळे मुंबईत गाडी चालविणार असाल तर किमान दोन वेळा विचार करा नाहीतर पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागण्याची शक्यता आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: August 19, 2020, 6:10 PM IST

ताज्या बातम्या