मुंबईत कारचा भीषण अपघात, 9 जखमी

दादर-माटुंगा फ्लाईओवर स्कॉर्पिओ कार आणि ट्रक समोरासमोर आल्यानं झाला हा भीषण अपघात

Samruddha Bhambure | News18 Lokmat | Updated On: Apr 30, 2017 02:49 PM IST

मुंबईत कारचा भीषण अपघात, 9 जखमी

29 एप्रिल : दादर-माटुंगा फ्लाईओवर काल (शनिवारी) मध्यरात्री कार आणि ट्रकची जोरदार टक्कर झाली. या भीषण अपघातात 9 जण गंभीर जखमी झाले असून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचं सांगण्यात येतं.

दादर-माटुंगा फ्लाईओवर स्कॉर्पिओ कार आणि ट्रक समोरासमोर आल्यानं हा भीषण अपघात झाला असल्याचं सांगण्यात येतं. या अपघातात कारचा पूर्ण चेंदामेंदा झाला आहे. जखमींना बाजूच्याच सायन रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं असून जखमीपैकी काही जणांची प्रकृती गंभीर असल्याचीही प्राथमिक माहिती समजली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून अधिक तपास सुरू आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 30, 2017 02:49 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...