'आपल्याला सत्य हे स्वीकारले पाहिजे. काँग्रेसच्या सुमार कामगिरीमुळे बिहारमध्ये महागठबंधन सरकार स्थापन करता आले नाही. काँग्रेस पक्षाला याबद्दल आत्मचिंतन करण्याची गरज आहे', असा सल्लावजा टोलाच तारीक अन्वर यांनी पक्षाला लगावला आहे. सत्ताबदल करण्यासाठी ट्रम्प यांची आणखी एक चाल, पेंटागॉनमध्ये केले बदल आपण बिहार निवडणुकीत नेमकं कुठल्या कारणाने हरलो याचा विचार केला पाहिजे, आपली नेमकी चूक कुठे झाली आहे, याचा शोध घेतला पाहिजे. MIM पक्षाने बिहारच्या राजकारणात एंट्री केली हे चांगले लक्षण नाही, असंही तारीक अन्वर यांनी म्हटलं आहे. नितीशकुमारांना मुख्यमंत्रिपदी लादणे हा लोकमताचा अवमान, सेनेचं टीकास्त्र बिहार विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी झंझावती प्रचार केला होता. त्यांनी मोदी सरकार आणि नितीशकुमार यांच्याविरोधात जोरदार प्रचार केला होता. पण, काँग्रेसच्या वाट्याला फक्त 19 जागा आल्या आहे. तर तेजस्वी यादव यांच्या पक्षाने सर्वाधिक 75 जागा जिंकल्या आहे. एनडीएनला अगदी काठावर बहुमत मिळाले आहे. बिहार निवडणुकीतच नाहीतर मध्यप्रदेश, गुजरातसह इतर राज्यातील पोटनिवडणुकीत सुद्धा काँग्रेसला पराभवाचा सामना करावा लागला. मध्य प्रदेशमध्ये तर काँग्रेससाठी पोटनिवडणूक ही प्रतिष्ठेचा विषय होता. पण, तिथेही ज्योतिरादित्य शिंदे यांनी आपला करिश्मा दाखवत भाजपला यश मिळवून दिले. 28 जागांपैकी काँग्रेसला फक्त 9 जागांवर विजय मिळवता आहे.हमें सच को स्वीकार करना चाहिए। कांग्रेस के कमज़ोर प्रदर्शन के कारण महागठबंधन की सरकार से बिहार महरूम रह गया।कांग्रेस को इस विषय पर आत्म चिंतन ज़रूर करना चाहिए कि उस से कहाँ चूक हुई ? MIM की बिहार में इंटरी शुभ संकेत नहीं है।
— Tariq Anwar (@itariqanwar) November 12, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: BJP, Congress, Rahul gandhi