मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल

या एसी लोकलचा प्रवास २५ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून करता येणार आहे.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 20, 2017 10:02 AM IST

मुंबईत लवकरच धावणार एसी लोकल

20 डिसेंबर: मुंबईकरांसाठी एक आनंदाची बातमी आहे. रेल्वेचा आशादायी प्रकल्प असलेली एसी लोकल लवकरच मुंबईत रूळांवर धावणार आहे. यामुळे मुंबईच्या दमट वातावरणातही प्रवाशांना सुसह्य तापमानात प्रवास करता येणार आहे.

या एसी लोकलचा प्रवास २५ डिसेंबर किंवा १ जानेवारीपासून करता येणार आहे. एसी लोकलला लागणाऱ्या सर्व परवानग्या मिळाल्या आहेत, आणि येत्या काही दिवसात पश्चिम रेल्वेवर गारेगार प्रवास करता येणार आहे. कोणतीही नवी रेल्वे सेवा करायची असली की रेल्वेच्या सेफ्टी बोर्डकडून परवानगी घ्यावी लागते. गेले अनेक महिने एसी लोकलच्या चाचण्या सुरू होत्या. ही लोकल सुरूवातीला पश्चिम रेल्वे मार्गावर धावणार आहे. ही लोकल सर्व स्थानकांवर थांबणार नाही. बोरिवली, अंधेरी, वांद्रे, दादर, मुंबई सेंट्रल, आणि मुंबई सेंट्रल ते चर्चगेट दरम्यान सर्व स्थानकांवर थांबेल, असं समजतंय. या पट्ट्यामधल्या व्यापारी वर्गाला आकर्षित करण्यासाठी हे सलग थांबे दिले गेले आहेत.

त्यामुळे आता या नव्या प्रकल्पाचा मुंबईकरांना काही फायदा होतो का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 20, 2017 09:22 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...