मुंबईत ऐन थंडीत एसी लोकल सुरू

मुंबईतली लोकल सेवा १८५३ साली सुरू झाली. त्यानंतर लोकलच्या तंत्रज्ञानात अनेक बदल झाले. पण एसी लोकलचं हे पर्व विशेष मानलं जातंय.

Chittatosh Khandekar | News18 Lokmat | Updated On: Dec 25, 2017 10:24 AM IST

मुंबईत ऐन थंडीत एसी लोकल सुरू

25 डिसेंबर:  आजपासून मुंबईकरांच्या गारेगार प्रवासाला सुरूवात होणार आहे. आज सकाळी साडे दहा वाजता बोरिवलीहून  थोड्याच वेळात सुटेल.  चर्चगेटच्या दिशेनं पहिली एसी लोकल सुटेल.

मुंबईतली लोकल सेवा १८५३ साली सुरू झाली. त्यानंतर लोकलच्या तंत्रज्ञानात अनेक बदल झाले. पण एसी लोकलचं हे पर्व विशेष मानलं जातंय. देशात आतापर्यंत कुठेही लोकल गाडी एसी नाहीये. पहिला मान मुंबईलाच मिळाला आहे. एसी लोकलचं किमान भाडं 60 तर कमाल भाडं 200 रुपये असेल अशी माहिती मिळतेय. विशेष म्हणजे या भाड्यामध्ये जीएसटी अंतर्भूत करण्यात आलाय. मुंबईमध्ये धावणारी पहिली-वहिली एसी लोकल पूर्णपणे भारतीय बनावटीची असून, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तिची निर्मिती झालीय. पहिल्या एसी लोकलचा प्रयोग यशस्वी झाल्यानंतर 11 एसी लोकल बनवण्यात येणार आहेत.

 

कशी आहे एसी लोकल ?

- एकूण क्षमता - 5964 प्रवासी

Loading...

- 1028 प्रवाशांसाठी बसण्याची सोय

- 4936 प्रवाशांना उभं राहून जाता येणार

- रोज एकूण 12 फेऱ्या

- फास्ट एसी लोकल - 8

- धीम्या एसी लोकल - 4

- चर्चगेटच्या दिशेकडून पाचवा आणि बारावा डबा महिलांसाठी राखीव

- सातव्या, अकराव्या डब्यात 7 आसनं ज्येष्ठ नागरिकांसाठी

- संपूर्ण ट्रेन आतून जोडलेली

- स्वयंचलित दरवाजे

- प्रत्येक ट्रेनमध्ये तंत्रज्ञ असणार

- आपात्कालीन परिस्थितीत प्रवासी गार्डशी बोलू शकणार

- प्रत्येक डब्यात अग्निशमन यंत्रणा

 

एसी लोकलचं टाईम-टेबल 

 चर्चगेटच्या दिशेने जाणाऱ्या लोकल

बोरिवलीहून सुटणार- सकाळी ७.५४ वाजता

विरारहून सुटणार- सकाळी १०.२२ वाजता

विरारहून सुटणार- दुपारी १.१८ वाजता

बोरिवलीहून सुटणार - संध्याकाळी . ६.५५ वाजता

विरारहून सुटणार - संध्याकाळी . ५.४२ वाजता

विरारहून सुटणार- रात्री ९.२५ वाजता

- विरारच्या दिशेनं जाणाऱ्या एसी लोकल (सबहेडर)

चर्चगेटहून सुटणार- सकाळी ११.५० वाजता

चर्चगेटहून सुटणार- दुपारी २.५५ वाजता

चर्चगेटहून सुटणार- संध्याकाळी. ५.४९ वाजता

चर्चगेटहून सुटणार- संध्याकाळी ७.४९ वाजता

चर्चगेटहून सुटणार- संध्याकाळी ८.५४ वाजता

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 25, 2017 10:19 AM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...