S M L

मुंबईत एसी लोकल 1 जानेवारीला ट्रॅकवर

येत्या एक जानेवारीला मुंबईत पहिली एसी लोकल रूळांवर धावणार आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Oct 26, 2017 11:57 AM IST

मुंबईत एसी लोकल 1 जानेवारीला ट्रॅकवर

26 ऑक्टोबर: मुंबईकरांना येत्या नवीन वर्षाचं एक गिफ्ट मिळणार आहे. येत्या एक जानेवारीला मुंबईत पहिली एसी लोकल रूळांवर धावणार आहे.

ही एसी लोकल 110 किलोमीटर प्रतितास हा या गाडीचा सर्वाधिक वेग असेल. या गाडीत 1028 जागा असतील. तर 5 हजार 964 प्रवासी नेण्याची क्षमता एसी लोकल मध्ये असेल, एसी लोकलंच तिकीट फर्स्ट क्लासच्या तिकीटाएवढं असण्याचा अंदाज वर्तवण्यात येतो आहे. तर महिन्याचा पास फर्स्ट क्लासच्या दिडपट असू शकतो. अंदाजे प्रत्येक स्टेशनवर 20 ते 30 सेकंद थांबा असेल. आपत्कालीन परिस्थितीत लोकलचे दरवाजे उघडण्यासाठी आतून आणि बाहेरुन नॉब असतील.पहिली एसी लोकल पश्चिम रेल्वेवर धावेल तर त्यानंतर सेन्ट्रल लाईनवरही एसी लोकल सुरू होऊ शकते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Oct 26, 2017 11:57 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close