S M L

एका एसी लोकलमुळे 12 साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द

मुळातच वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येक प्रवाशाला परवडणारे नाही. 60 ते 200 रूपये इतके या लोकलचे भाडे तर सामान्य लोकले भाडे 10-30 रूपये इतके आहे. त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेने काय साधले, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे.

Chittatosh Khandekar | Updated On: Dec 26, 2017 10:10 AM IST

एका एसी लोकलमुळे 12 साध्या लोकलच्या फेऱ्या रद्द

26 डिसेंबर:  मुंबईकरांच्या थंडगार प्रवासाला सोमवारी सुरूवात झाली आहे. काही प्रवाशांना जरी दिलासा मिळाला असला तरी या लोकलच्या फेऱ्यांसाठी साध्या लोकलच्या बारा फेऱ्या रद्द करण्यात आल्या आहेत.

मुळातच वातानुकूलित लोकलचे भाडे प्रत्येक प्रवाशाला परवडणारे नाही. 60 ते 200 रूपये इतके या लोकलचे भाडे  तर सामान्य लोकले भाडे 10-30 रूपये इतके आहे.  त्यामुळे सध्याच्या लोकल फेऱ्या रद्द करून पश्चिम रेल्वेने काय साधले, असा सवाल प्रवाशांनी उपस्थित केला आहे. २५ डिसेंबर ते २९ डिसेंबपर्यंत वातानुकूलित लोकलच्या प्रत्येक दिवशी सहा फेऱ्या होणार आहेत. तर १ जानेवारीपासून १२ फेऱ्या होतील. त्यामुळे या वाढीव  फेऱ्यांचा अजून किती साध्या लोकल्सवर परिणाम होईल हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

लोकल ही मुंबईकरांची लाईफलाईन आहे. नवीन आधुनिक तंत्रज्ञाम आणताना पायाऊत सुविधांचा आणि प्रवाशांच्या सोयीचा विचार करणं गरजेचं असतं. त्यामुळे  आता प्रवाशांची गैरसोय सरकार दुर करणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.सकाळी १० वाजून २१ मिनिटांनी बोरिवली स्थानकातून या प्रवासाला सुरुवात झाली. शिक्षणमंत्री विनोद तावडे, खासदार किरीट सोमैया, मुंबई भाजप अध्यक्ष आशिष शेलार यांनी उद्घाटनाला हजेरी लावली. एसी लोकलचं किमान भाडं 60 तर कमाल भाडं 200 रुपये असेल अशी माहिती मिळतेय. या भाड्यामध्ये जीएसटी अंतर्भूत करण्यात आलाय. मुंबईमध्ये धावणारी पहिली-वहिली एसी लोकल पूर्णपणे भारतीय बनावटीची असून, चेन्नईच्या इंटिग्रल कोच फॅक्टरीमध्ये तिची निर्मिती झालीय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा

First Published: Dec 26, 2017 10:10 AM IST
Loading...

लोकप्रिय बातम्या

Live TV

News18 Lokmat
close