मुंबई, 4 ऑक्टोबर : उत्तर प्रदेशमधील हाथरस सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणामुळे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. आधी काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांना धक्काबुक्की झाली. त्यानंतर प्रियांका गांधी यांच्याशी पोलिसांनी गैरवर्तन केल्याचे समोर आले आहे. त्यामुळे 'क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है?' असा संतप्त सवाल शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.
शनिवारी काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियांका गांधी यांनी उत्तर प्रदेशातील हाथरसमध्ये जात बलात्कार पीडितेच्या कुटुंबियांची भेट घेतली. मात्र, ही भेट घेण्यासाठी जात असताना वाटेत प्रियांका गांधी यांच्यासोबत पोलिसांकडून संतापजनक प्रकार घडला आहे. एक पुरुष पोलीस अधिकारी प्रियंका गांधी यांच्या कपड्याला हात लावत असल्याचं फोटोतून दिसत आहे. या घटनेबाबत चहुबाजूंनी टीका केली जात आहे.
या फोटोवरून शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांनी तीव्र संताप व्यक्त करत योगी सरकारवर सडकून टीका केली आहे. योगी सरकारमध्ये महिला पोलीस नाहीत का? असा संतप्त सवाल राऊत यांनी उपस्थितीत केला आहे.
क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है? pic.twitter.com/nBx6YnQc9Q
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 3, 2020
तर काँग्रेसचे राष्ट्रीय प्रवक्ते रणदीप सिंह सुरजेवाला यांनी उत्तर प्रदेश पोलिसांनी केलेल्या वर्तवणुकीमुळे तीव्र संताप व्यक्त केला आहे. यापेक्षा लाजीरवाणा आणि घातक काय असू शकते? अशी गुंडगिरी करणाऱ्या भाजप आणि योगी सरकार उतरले आहे. प्रियांका गांधी यांच्यावर एका पुरूष पोलिसाने धक्काबुक्की केली, आदित्यनाथ यांनी कोणते संस्कार यातून दिले आहे? पोलिसांच्या मागे न लपता समोर येऊन राजीनामा द्या, अशी मागणी सुरजेवाला यांनी केली.
क्या योगीजी के राज में महिला पोलीस नही है? pic.twitter.com/nBx6YnQc9Q
— Sanjay Raut (@rautsanjay61) October 3, 2020
तर दुसरीकडे मनसेच्या पुण्यातील नेत्या रुपाली पाटील ठोंबरे यांनीही एक फेसबुक पोस्ट लिहित या घटनेबद्दल संताप व्यक्त केला. 'काय चाललंय युपी पोलिसांचे राव या पोलिसांचे कानफाड फोडले पाहिजे,' अशा आक्रमक शब्दांत रुपाली पाटील ठोंबरे यांनी आपल्या भावना मांडल्या आहेत. यासंदर्भात त्यांनी एक फेसबुक पोस्ट लिहिली आहे.
प्रियांका गांधींसारख्या राष्ट्रीय नेत्यासोबत घडलेल्या प्रकारानंतर महाराष्ट्र काँग्रेसही मैदानात उतरली आहे. महाराष्ट्र युवक काँग्रेसचे अध्यक्ष सत्यजीत तांबे यांनी भाजपला इशारा दिला आहे. 'भाजपावालो, करारा जवाब मिलेगा,' असं ट्वीट सत्यजीत तांबे यांनी केलं आहे.