1993बॉम्बस्फोट प्रकरण: अबू सालेमला आजन्म जन्मठेप तर इतर दोघांना फाशीची शिक्षा

1993बॉम्बस्फोट प्रकरण: अबू सालेमला आजन्म जन्मठेप तर इतर दोघांना फाशीची शिक्षा

या 1993 बॉंम्बस्फोटाचा प्रमुख आरोपी अबू सालेमला जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. बाकी 5 आरोपींपैकी करीम उल्लाह खान याला जन्मठेपेची शिक्षा आणि साडेसात लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ताहीर मर्चंटला आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रियाझ सिद्धीकीला 10 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई, 07 सप्टेंबर :   मुंबई हायकोर्टात निकाल 1993च्या खटल्याचा निकाल सुनावला आहे. पाचही आरोपींना शिक्षा सुनावण्यात आली आहे.  या 1993 बॉंम्बस्फोटाचा प्रमुख  आरोपी अबू सालेमला  आजन्म जन्मठेपेची शिक्षा ठोठावण्यात आली आहे.

बाकी  5 आरोपींपैकी करीम उल्लाह खान याला जन्मठेपेची शिक्षा  आणि साडेसात लाखाचा दंड ठोठावण्यात आला आहे. तर ताहीर मर्चंटला आणि फिरोज खानला फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आहे. रियाझ सिद्धीकीला 10 वर्षाची तुरूंगवासाची शिक्षा सुनावण्यात आली आहे.

ताहीर मर्चंटला फाशी द्यावी अशी मागणी सीबीआयच्या वकिलांनी केली होती. मुंबई बॉम्बस्फोट खटल्याचा दुसरा भाग म्हणून या खटल्याकडं पाहिलं जातं होतं. यात अबू सालेम मुख्य दोषी होता. त्याचा गुन्हा फाशी देण्याइतपत गंभीर आहे. पण पोर्तुगालशी असलेल्या गुन्हेगार हस्तांतरण कायद्यामुळे सालेमला फाशी देण्याची मागणी करता आलेली नव्हती.

1993 च्या मुंबई बॉम्बस्फोट कटात सालेमचा सहभाग होता. मुस्तफा आणि मोहम्मद डोसाच्या मदतीनं सालेमनं मुंबईत शस्त्रं उतरवली होती. गुजरातच्या भरूचमधून ही शस्त्रं मुंबईत आणली. या शस्त्रसाठ्यात 9 एके-56 रायफल्स, 82 हँड ग्रेनेड्स आणि शेकडो काडतुसं होती. ही शस्त्रं त्यानं संजय दत्त, बाबा मुसा, झैबुन्नीसा काझी यांच्याकडं दिली. टाडा कायदा, शस्त्रास्त्र कायदा, बेकायदा स्फोटक पदार्थ बाळगल्याप्रकरणी त्याला दोषी ठरवण्यात आलं होतं.

 

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 6, 2017 06:25 PM IST

ताज्या बातम्या