'अबू सालेम फाशीच्याच लायकीचा,पण जन्मठेप द्या', सीबीआयची कोर्टात मागणी

'अबू सालेम फाशीच्याच लायकीचा,पण जन्मठेप द्या', सीबीआयची कोर्टात मागणी

अबू सालेमचं कृत्य हे खरंतर फाशीच्या शिक्षेसाठी योग्य आहे पण भारतीय गुन्हेगार हस्तांतरण कायद्यातल्या ३४ क या कलमामुळे..."

  • Share this:

विवेक कुलकर्णी, मुंबई

04 जुलै : १९९३ साखळी बाॅम्बस्फोट प्रकरणी सीबीआयनं कुख्यात गँगस्टर आणि या प्रकरणातील दोषी अबू सालेमला जन्मठेपेची मागणी केली आहे. तसंच यातील दुसरा आरोपी रियाज सिद्दीकीलाही जन्मठेपेची मागणी केलीये.

अबू सालेमचं कृत्य हे खरंतर फाशीच्या शिक्षेसाठी योग्य आहे पण भारतीय गुन्हेगार हस्तांतरण कायद्यातल्या ३४ क या कलमामुळे आम्हाला फाशीची शिक्षा करता येत नसल्याचं सीबीआयचे वकील दीपक साळवी विशेष टाडा कोर्टाला सांगितलं. अबूनं केलेलं कृत्य किती भयंकर होतं हे सगळ्या जगाला कळणं गरजेचं असल्यानं तो फाशीची शिक्षा देण्यासाठी कसा पात्र आहे हे आम्हाला सांगायचं आहे असं साळवी यांनी कोर्टाला सांगितलं.

जर अबूसाठी जन्मठेपेची शिक्षा असेल तर मग त्याच्या फाशीबद्दल युक्तीवाद का ?, करता आहात असा सवाल कोर्टाने साळवी यांना विचारला. तेव्हा साळवी यांनी अशा गुन्हेगारांबद्दल फाशीचा विचार केला पाहिजे अशी भारत आणि युकेचे पंतप्रधानांच्या पातळीवर चर्चा सुरू आहे, त्यामुळे उद्या त्या संबंधीचा काही निर्णय झाल्यास आम्ही कोर्टासमोर अशी मागणी केली नाही असं होऊ नये असा साळवी यांनी युक्तीवाद केला.

अबू हा सातत्यानं गुन्ह्यांमध्ये गुंतलेला असून त्याला दोनदा कोर्टाने दहशतवादी घोषित केलेलं असल्यानं त्याला खरंतर फाशी व्हायला हवी आम्हाला कायद्याचं बंधन असल्यानं त्याला आम्ही फाशी मागत आहोत असा युक्तीवाद सीबीआयनं केला. उद्या अबू सालेमचे वकील सुदीप पासबोला त्याच्या बचावार्थ युक्तीवाद करणार आहेत.

सीबीआयनं का मागितली अबू सालेमकरता जन्मठेप  ?

-  बाॅम्बस्फोटातल्या मुख्य कटकारस्थानात सहभागी

- मुस्तफा डोसा आणि मोहम्मद डोसा यांच्या  मदतीने मुंबईत शस्रास्रं आणली

- पांढऱ्या मारुती शस्रास्रं व्हॅनमधून गुजरातच्या भरुच येथून मुंबईत आणली

- यात ९ एके ५६, ८२ हॅंड ग्रेनेड अाणि काही शे काडतुसं होती

- मुंबईत त्यानं अभिनेता संजय दत्त, बाबा मूसा आणि झैबुन्निसा काझी यांच्याकडे दिली

- संजय दत्तकडून त्यानं पुन्हा दोन एके ५६ ताब्यात घेतल्या आणि काही हॅंडग्रेनेडही परत नेले

- लोकांना घाबरवण्यासाठी आणि दहशत पसरवण्यासाठी ही शस्रास्रं आणण्यात आली होती

- टाडा कायदा, शस्रास्रं कायदा, explosive substances Act, IPC अंतर्गत दोषी

First published: July 4, 2017, 5:55 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading