अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार? मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटले

अब्दुल सत्तार भाजपमध्ये प्रवेश करणार? मध्यरात्री मुख्यमंत्र्यांना भेटले

काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. पहिल्या भेटीमध्ये गिरीश महाजन उपस्थित होते.

  • Share this:

सिद्धार्थ गोदाम, प्रतिनिधी

मुंबई, 04 एप्रिल : काँग्रेसला राजीनामा ठोकलेले आणि लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी न मिळाल्यामुळे नाराज अब्दुल सत्तार यांनी रात्री 2 वाजता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांच्यासहित ते रात्री विशेष विमानाने मुंबईला आले.

काँग्रेसचे आमदार असलेल्या अब्दुल सत्तार यांनी लोकसभेसाठी उमेदवारी अर्ज दिला नाही. त्यावर नाराज होत त्यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आणि उमेदवारी मिळवण्यासाठी धडपड सुरू केली. पण रात्री त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याने सत्तार भाजपमध्ये येणार का? याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू आहे.

काँग्रेसला राजीनामा दिल्यानंतर सत्तार यांनी मुख्यमंत्र्यांची ही दुसऱ्यांदा भेट घेतली आहे. पहिल्या भेटीमध्ये गिरीश महाजन उपस्थित होते. यावेळी अब्दुल सत्तार यांनी भाजपमध्ये येण्याची तयारी दाखवली होती. पण मराठवाडा हा रावसाहेब दानवे यांच्या हाती आहे. त्यामुळे यासंदर्भात चर्चा करण्यासाठी दानवे उपस्थित असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं.

त्यामुळे यावेळी ज्यांच्याविरोधात लोकसभा निवडणुक लढवणार असलं त्यांच्यासोबतच अब्दुल सत्तार यांनी औरंगाबाद ते मुंबई असा विशेष विमानानं प्रवास केला. त्यामुळे आता अब्दुल सत्तार भाजपमध्ये येणार का असा प्रश्न विचारला जात आहे.

गेल्या काही दिवसांपासून औरंगाबादमधून कोणाला उमेदवारी द्यायची यावरून वाद सुरु होता. झांबड यांना उमेदवारी मिळणार यावर नाराज झालेल्या अब्दुल सत्तार यांनी जिल्हा अध्यक्षपदाचा राजीनामा दिला होता.

उमेदवारी न मिळाल्याने अब्दुल सत्तार नाराज, काँग्रेस कार्यालयातील 300 खुर्च्या नेल्या

लोकसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे नाराज असलेले काँग्रेसचे अब्दुल सत्तार यांनी समर्थकांच्या मदतीने पक्षाच्या स्थानिक कार्यालयातून 300 खुर्च्या उचलल्या. सिल्लोडचे आमदार अब्दुल सत्तार यांनी काँग्रेसला राजीनामा दिला आहे. मी पक्षाचा राजीनामा दिला आहे. त्यामुळे कार्यालयातील माझ्या खर्चातून आणलेल्या खुर्च्या मी घेऊन जात असल्याचं सत्तार यांनी म्हटलं होतं.

VIDEO : रोहित पवारांना आवडते राज ठाकरेंची ही खास स्टाईल!

First published: April 4, 2019, 8:00 AM IST

ताज्या बातम्या