आरेमधल्या मेट्रो - 3 च्या कारशेडला स्थगिती नाही पण सुप्रीम कोर्टाने विचारले हे सवाल

आरेमधल्या मेट्रो - 3 च्या कारशेडला स्थगिती नाही पण सुप्रीम कोर्टाने विचारले हे सवाल

मेट्रो- 3 ची कारशेड उभारण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MMRCL ने किती झाडं लावली याचा अहवाल सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं आहे.

  • Share this:

मुंबई, 21 ऑक्टोबर : मेट्रो- 3 ची कारशेड उभारण्यासाठी सुप्रीम कोर्टाने स्थगिती दिलेली नाही. मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशन लिमिटेड म्हणजेच MMRCL ने किती झाडं लावली याचा अहवाल सादर करावा, असं कोर्टाने सांगितलं आहे. आता पुढची सुनावणी 15 नोव्हेंबरला आहे.कोर्टाने सध्या आरे मध्ये जैसे थे स्थिती ठेवण्याचा आदेश दिला आहे. याचा अर्थ आता आणखी झाडं तोडली जाणार नाहीत. मेट्रो कारशेडसाठी आरेमध्ये किती झाडं तोडण्यात आली आणि किती नवी झाडं लावण्यात आली, असं कोर्टाने विचारलं.

वृक्षतोडीला पर्यावरणवाद्यांचा आक्षेप

आरेमधल्या स्थितीची छायाचित्रं दाखवण्यात यावीत, असंही कोर्टाने सांगितलं. आरेमध्ये व्यावसायिक प्रकल्पाचा प्रस्ताव आहे का, असाही सवाल कोर्टाने विचारला. फक्त कारशेडच नाही तर या पूर्ण परिसराचा आढावा घ्यायला हवा, सध्या हा कारशेडचा प्रकल्प सुरू राहू शकतो, प्रकल्प रोखण्यात आलेला नाही, असंही कोर्टाने म्हटलं आहे.

(हेही वाचा : PMC बँकेच्या खातेदारांना दिलासा, या खास कारणांसाठी काढू शकता 1 लाख रुपये)

याआधी मेट्रो कारशेडच्या प्रकल्पासाठी आरेमध्ये वृक्षतोड करण्यात आली होती. याला पर्यावरणवादी कार्यकर्त्यांनी जोरदार आक्षेप घेत आंदोलन केलं. आता पुन्हा एकदा 15 नोव्हेंबरच्या सुनावणीत काय होतं ते पाहावं लागेल.

=========================================================================================

घोड्यावर बसून तरुण आले मतदानाला, पाहा VIDEO

First published: October 21, 2019, 3:46 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading