आमिर खाननं गमावली सर्वात जवळची व्यक्ती, 25 वर्षं करत होते एकत्र काम

आमिर खाननं गमावली सर्वात जवळची व्यक्ती, 25 वर्षं करत होते एकत्र काम

या व्यक्तीच्या निधनामुळे आमिर खान आणि किरण राव यांनी एक सर्वात जवळची व्यक्ती गमावली आहे.

  • Share this:

मुंबई, 13 मे : काही दिवसांपूर्वीच बॉलिवूडनं दोन महान अभिनेत्यांना गमावलं आहे. अशात आता फिल्म इंडस्ट्रीशी संबंधित आणखी एक वाईट वृत्त समोर आलं आहे. अभिनेता आमिर खानचे असिस्टंट अमोस यांचं निधन झालं आहे. आमिर आणि अमोस यांचं एक खास नातं होतं त्यामुळे त्यांच्या निधनानं आमिरला मोठा धक्का बसला आहे. अमोस मागची 25 वर्षं आमिरचे असिस्टंट होते. अचानक तब्येत बिघडल्यानं आमिर आणि त्याची पत्नी किरण राव यांनी त्यांनी रुग्णालयात नेलं. पण उपचारा दरम्यान त्यांनी वयाच्या 60 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला

अमोस यांचं निधन हार्ट अॅटॅकमुळे झाल्याचं सांगण्यात येत आहे. 60 वर्षीय अमोस यांनी होली फॅमिली हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं होतं. याच ठिकाणी त्यांचं निधन झालं. मीडिया रिपोर्टनुसार त्यांच्या निधनाची माहिती आमिरसोबत लगान सिनेमात काम करणाऱ्या करीम हाजी यांनी दिली. त्यांनी सांगितलं की, अमोस यांची तब्येत सकाळी अचानक बिघडली आणि ते खाली पडले. त्यानंतर आमिर खान आणि त्याची पत्नी किरण यांनी त्यांना लगेचच हॉस्पिटलमध्ये दाखल केलं.

अमोस काही दिवसांपूर्वीच आजोबा झाले होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुलं, सुना आणि नातवंड असा परिवार आहे. करीम हाजी पीटीआयशी बोलताना म्हणाले, अमोस आमिरसाठी काम करायचे मात्र त्यांचा स्वभाव खूपच साधा होता. ते खूप मेहनती आणि चांगले व्यक्ती होते.

करीम हाजी यांनी पुढे सांगितलं की, त्यांचं असं अचानक जाणं कोणालाच अपेक्षित नव्हतं. त्यांच्या निधनानं सर्वांनाच धक्का बसला कारण त्यांना कोणताही आजार नव्हता. त्यांच्या निधनामुळे आमिर आणि किरण यांनी एक सर्वात जवळची व्यक्ती गमावली आहे. आमिरनं आम्हाला एक मेसेज करून त्यांच्या निधनाबद्दल सांगितलं होतं.

हे वाचा :

'तेरे बिना'मध्ये सलमानची ऑनस्क्रीन मुलगी साकारणारी 'ती' बालकलाकार आहे तरी कोण?

Lockdwon: 'नागिन 4' फेम अभिनेत्रीचं लग्न रखडलं, आता सतावतेय घराच्या EMI ची चिंता

First published: May 13, 2020, 10:38 AM IST

ताज्या बातम्या