'युती'च्या जागावाटपावर 'हे' आहे आदित्य ठाकरेंचं उत्तर!

'युती'च्या जागावाटपावर 'हे' आहे आदित्य ठाकरेंचं उत्तर!

राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आता फक्त दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप शिवसेनेने यात आघाडी घेतलीय.

  • Share this:

अजित मांढरे, ठाणे 26 ऑगस्ट : युतीतील जागा वाटपांबाबत चर्चा पडद्यामागे सुरू असली तरी  शिवसेनेचे नेते मंत्री यांवर बोलणं जाणीवपुर्वक टाळत आहेत. ठाण्यात एका कार्यक्रमा दरम्यान युती बाबत चंद्रकांत पाटील यांनी युतीचा फॉर्म्युल्याच्या वक्तव्या संदर्भात युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांना पत्रकारांनी प्रश्न विचारला मात्र त्यांनी या विषयावर कुठलंही वक्तव्य करणं टाळलं. या विषयावर बोलणार नाही असंही ते म्हणाले. ठाण्यात वैद्यकीय व दंत महारोग्य शिबीर उदघाटन प्रसंगी युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे आले होते यावेळेस त्यांना पत्रकारांनी युती जागा वाटपा बाबत प्रश्न विचारला असता त्यांनी नो कॉमेंट्स असं उत्तर दिलं.

'अमितभाई आणि मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून जागावाटप'

राज्यातल्या विधानसभेच्या निवडणुका आता फक्त दोन महिन्यांवर आल्या आहेत. त्यामुळे सगळ्याच पक्षांची जोरदार तयारी सुरू आहे. भाजप शिवसेनेने यात आघाडी घेतलीय. अर्ध्या अर्ध्या जागा मिळून लढविण्याचं दोन्ही पक्षांनी ठरवलंय. मात्र त्याला अंतिम स्वरुप देण्यात आलं नव्हतं. शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी त्याबाबत रविवारी स्पष्टिकरण दिलंय. भाजप आणि शिवसेनेचे जागावाटप हे भाजपाध्यक्ष अमित शह आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी बोलून ठरविणार असल्याचं उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं. गेल्या काही दिवसांमध्ये याबाबत उलट सुलट चर्चा होत होती त्यामुळे त्या चर्चेंना आता पूर्ण विराम मिळणार आहे.

हेही वाचा - काँग्रेस काय करणार 'महापर्दाफाश'? जनतेनेच पोल खोलली; मुख्यमंत्र्यांचा पलटवार

युतीतल्या मित्रपक्षांना जागा सोडून राहिलेल्या जागा अर्ध्या अर्ध्या लढविण्याचं भाजप आणि शिवसेनेत ठरलं आहे. काही जागांची अदलाबदल होण्याची शक्यताही व्यक्त केली जातेय. मात्र फारसी काही अडचण येणार नाही असा अंदाच व्यक्त केला जातोय. त्यामुळे लवकरच या प्रश्नावर तोडगा निघण्याची शक्यता आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीचे अनेक नेते भाजप आणि शिवसेनेत प्रवेश करत आहेत.

हेही वाचा - सांगली पाण्यात बुडत असताना सरकार मौज मस्ती करत होतं - थोरात

बहूजन विकास आघाडीचे बोईसर विधान सभा मतदारसंघांचे आमदार विलास तरे यांनी आज शिवसेनेत प्रवेश केला. मातोश्रीवर शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे, एकनाथ शिंदे आणि शिवसेना सचिव मिलींद नार्वेकर यांच्या उपस्थितीत त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले,  कुठलेही टार्गेट नाही , आमच्या कडे कोणते ही वॉशिंग पॉवडर नाही. शिवसेनेचं काम पाहता आकर्षित पक्ष प्रवेश होत आहेत. चांगलं काम करण्यासाठी शिवसेनेला साथ मिळत आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Aug 26, 2019 05:55 PM IST

ताज्या बातम्या