Home /News /mumbai /

'बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही', आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

'बंडखोरांना भाजपशिवाय पर्याय नाही', आदित्य ठाकरेंचं मोठं विधान

युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे.

    मुंबई, 24 जून : युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांनी शिवसेनेच्या बंडखोर आमदारांबाबत मोठं विधान केलं आहे. शिवसेनेचे (Shiv Sena) बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांच्याकडून आपण शिवसेनेतच आहोत, असं विधान वारंवार करण्यात येत आहे. पण त्यांच्या या विधानाला आदित्य ठाकरे यांनी अप्रत्यक्ष उत्तर दिलं आहे. "काही लोकांकडून आपण शिवसेनेसोबतच आहोत, असं म्हटलं जात आहे. पण हे सगळं खोटं आहे. आता त्यांना पुढची वाट ही भाजपशिवाय पर्याय नाही, असं झालं आहे. त्यांना आता भाजपात विलिन होण्याशिवाय पर्याय नसेल", असं आदित्य ठाकरे म्हणाले. आदित्य ठाकरे नेमकं काय म्हणाले? "शिवसेनेचे आमदार गुवाहाटी किंवा कुठे दुसरीकडे असतील त्यापैकी 50 टक्के आमदार आपल्यासोबत आहेत. कारण त्यांना जेवायला चला म्हणून नेलं आणि पुढे कैदी म्हणून ठेवलं आहे. ही लढाई पुढे कशी जाईल याचा आपल्या कुणालाही अंदाज नाही. खरं बघितलं तर मुख्यमंत्र्यांनी दोन-तीन आठवड्यांपूर्वी बंडाची कुरबूर ऐकली होती. तेव्हा त्यांनी सर्व आमदारांना बोलावून घेतलं होतं आणि सांगितलं होतं. तुम्हाला जर मुख्यमंत्रीपद हवं असेल तर तुम्ही मला समोर येऊन सांगा. तुम्हाला मुख्यमत्री बनवून देतो. हे काही कुठल्या पदासाठी नव्हतं. केवळ चार-पाच लोकांच्या राक्षसी महत्त्वकांक्षा होती. हातात जी सत्ता आलीय ती पचवू शकत नाही म्हणून हे पाऊल उचललं आहे", अशी टीका आदित्य ठाकरे यांनी केली. ('मातोश्री'त सत्ताकेंद्र, पवार-ठाकरेंमध्ये तब्बल दोन तास खलबतं, उद्या मोठा निर्णय होणार?) "काही लोकांकडून आपण शिवसेनेसोबतच आहोत, असं म्हटलं जात आहे. पण हे सगळं खोटं आहे. आता त्यांना पुढची वाट ही भाजपशिवाय पर्याय नाही, असं झालं आहे. त्यांना आता भाजपात विलिन होण्याशिवाय पर्याय नसेल. शिवसेनेत सन्माने राहायचं असेल तर एकच पर्याय आहे शिवसेनेत राहून शिवसेना पुन्हा बांधायचं आहे. जे आमदार तथे कैदी म्हणून बसले आहेत त्यांना सोडवून आणण्याचं आणि त्यांना परत आपल्यासोबत घेऊन पुढे न्यायचं आहे. हे सरकार टिकणार आहे. कारण तिकडचे आमदारही सोबत असल्याचं सांगत आहेत. नितीन देशमुख, कैलास पाटील आले आहेत. सगळं वेगळं चित्र उभं केलं आहे. रुसवे फुगवे असतील तर हिंमत असती तर महाराष्ट्रात राहून सांगितलं असतं. सूरत आणि गुवाहाटीत पळून जावून काय होणार होतं? पक्षप्रमुखांसोबत बोलायचं होतं. आता आपल्याला पुढे लढायचं आणि जिंकत जायचं आहे", असं आदित्य ठाकरे म्हणाले.
    Published by:Chetan Patil
    First published:

    Tags: Aaditya thackeray, Shiv sena

    पुढील बातम्या