मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /राहुल गांधींचं सावरकरांवर वादग्रस्त विधान; आदित्य ठाकरे म्हणतात, 'ही लढाई..'

राहुल गांधींचं सावरकरांवर वादग्रस्त विधान; आदित्य ठाकरे म्हणतात, 'ही लढाई..'

आदित्य ठाकरे म्हणतात, 'ही लढाई..'

आदित्य ठाकरे म्हणतात, 'ही लढाई..'

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विनायक सावरकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

मुंबई, 25 मार्च : काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा विनायक सावकर यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केलं आहे. शिवसेनेचं हिंदुत्व बेगडी असल्याचं सांगत भाजपने ठाकरेंवर हल्ला केलाय. सावरकरांवर काँग्रेसने केलेल्या टिकेचा उल्लेख करत भाजपने शिवसेनेला कात्रीत पकडण्याचा प्रयत्न केलाय. युवासेना प्रमुख (ठाकरे गट) आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका असतात. पण, आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भुमिका मान्य नसल्याचे आदित्य ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे.

राहुल गांधी काय म्हणाले?

मानहानीच्या प्रकरणात खासदारकी रद्द केल्यानंतर शनिवारी राहुल गांधी यांनी पत्रकार परिषदेत पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला. पत्रकार परिषदेत एका पत्रकाराने त्यांना लंडनमध्ये दिलेल्या भाषणाबाबत प्रश्न विचारला असता राहुल गांधी चांगलेच संतापलेले दिसले. भाजप नेते तुम्हाला संसदेत माफी मागायला सांगत होते, मग तुम्ही माफी का मागितली नाही, असा सवाल राहुल गांधींना करण्यात आला. तुम्ही याबद्दल काय विचार करता? या प्रश्नाला उत्तर देताना राहुल गांधींनी उत्तर दिले की, 'राहुल गांधींना वाटते की माझे नाव सावरकर नाही, माझे नाव गांधी आहे. गांधी कोणाची माफी मागत नाहीत.

वाचा - 'राहुल गांधींना घाण्याला जुंपलं पाहिजे', सावरकरांच्या विधानावरून मुख्यमंत्री शिंदेंनी सुनावलं

आदित्य ठाकरे काय म्हणाले?

राहुल गांधी यांच्या विधानानंतर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी प्रतिक्रिया दिली आहे. अनेक पक्षाच्या वेगवेगळ्या भुमिका आहेत. तशी काग्रेसची देखील एक भुमिका आहे. पण आम्हाला सावरकरांबाबत त्यांची भुमिका मान्य नाही. जसं भाजप पीडीपी बरोबर गेली ते सुद्धा आम्हाला मान्य नव्हते, असं म्हणत आदित्य ठाकरे यांनी भाजपलाच टोला लगावला आहे. प्रत्येकाचा विचार वेगळा आहे. ही लोकशाहीसाठी असलेली लढाई, असल्याचेही ठाकरे म्हणाले.

मोदी सरकारवर हल्लाबोल करताना काँग्रेस नेते राहुल गांधी म्हणाले, 'मी प्रश्न विचारणे सोडणार नाही. अदाणींचा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याशी काय संबंध आहे? मी या लोकांना घाबरत नाही. जर त्यांना वाटत असेल की माझी खासदारकी रद्द करून, धमकावून, मला तुरुंगात पाठवून ते मला बंद करू शकतात. पण, मी भारताच्या लोकशाहीसाठी लढत आहे आणि लढत राहीन.

First published:
top videos

    Tags: Aaditya Thackeray, Rahul gandhi