Home /News /mumbai /

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिलीच इन्स्टाग्राम पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष

उद्धव ठाकरेंच्या राजीनाम्यानंतर आदित्य ठाकरेंची पहिलीच इन्स्टाग्राम पोस्ट; कॅप्शनने वेधलं लक्ष

राजकीय घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे (Aaditya Thackeray Instagram Post). या पोस्टद्वारे त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे.

  मुंबई 03 जुलै : महाराष्ट्रात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेली राजकीय उलथापालथ आता थांबताना दिसत आहे (Maharashtra Political Crisis). एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या अनेक आमदारांनी पक्षाविरोधात बंड केलं. यानंतर राज्यपालांनी उद्धव ठाकरे सरकारला फ्लोर टेस्ट घेण्याचे आदेश दिले. पण फ्लोअर टेस्ट होण्यापूर्वीच उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा दिला. यानंतर शिंदे गटाने भाजपच्या पाठिंब्याने राज्यात सरकार स्थापन केलं. एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याच्या दुसऱ्याच दिवशी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिंदे यांची नेतेपदावरून हकालपट्टी केली. या सर्व राजकीय घडामोडीनंतर आदित्य ठाकरे यांनी इन्स्टाग्रामवर पहिली पोस्ट केली आहे (Aaditya Thackeray Instagram Post). या पोस्टद्वारे त्यांनी एक संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. महाराष्ट्राचे माजी मंत्री आदित्य ठाकरे यांनी शनिवारी इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली. या पोस्टमध्ये त्यांनी वडील उद्धव ठाकरे यांच्यासोबत चालतानाचा एक फोटो शेअर केला आहे. तसेच फोटोच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, 'नेहमी योग्य पावलावर चालणं खूप गरजेचं आहे.' या पोस्टद्वारे त्यांनी शिवसेना आणि संपूर्ण राज्यातील जनतेला खास संदेश देण्याचा प्रयत्न केला. याशिवाय आदित्य ठाकरे यांनी आपल्या समर्थकांचे आभार मानले आणि त्यांचं प्रेम आणि आशीर्वाद हीच खरी ताकद असल्याचं सांगितलं.
  याआधी आदित्य ठाकरे यांनी फादर्स डेच्या दिवशी महाराष्ट्राच्या राजकीय गदारोळात इंस्टाग्रामवर शेवटची पोस्ट केली होती. या पोस्टमध्ये त्यांनी त्यांचा बालपणीचा फोटो शेअर केला आहे, ज्यामध्ये ते वडील उद्धव ठाकरे यांच्या मांडीवर बसलेले दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये त्यांनी लिहिले, 'माझ्या प्रेरणा आणि शक्तीला फादर्स डेच्या शुभेच्छा!' महाराष्ट्रात नवे सरकार स्थापन झाल्यानंतर आज (रविवारी) सभापतीपदासाठी निवडणूक होणार आहे. सभापतीपदासाठी महाविकास आघाडीने भाजपचे आमदार राहुल नार्वेकर यांच्या विरोधात शिवसेना आमदार राजन साळवी यांना उमेदवारी दिली आहे. विधानसभेचे विशेष अधिवेशन आजपासून सुरू झालं आहे. विधानसभा अध्यक्ष निवडीनंतर एकनाथ शिंदे सरकारला उद्या फ्लोर टेस्टला सामोरे जावे लागणार आहे
  Published by:Kiran Pharate
  First published:

  Tags: Aaditya thackeray, Uddhav thackeray

  पुढील बातम्या