मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /

मंत्री आदित्य ठाकरेंसह नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, चौकशीसाठी SIT स्थापनेची गृहमंत्र्यांची घोषणा

मंत्री आदित्य ठाकरेंसह नेत्यांना जीवे मारण्याची धमकी, चौकशीसाठी SIT स्थापनेची गृहमंत्र्यांची घोषणा

 15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे.

15 जूनला आदित्य ठाकरे अयोध्या दौऱ्यावर जाणार आहे. 20 जूनला विधानपरिषद निवडणूक होणार आहे.

राज्याचे पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारणायाची धमकी देणाऱ्याला बंगळुरू येथून अटक करण्यात आली आहे.

मुंबई, 23 डिसेंबर : पर्यावरण आणि पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे (Aaditya Thackeray) यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली. याप्रकरणी एका आरोपीला बंगळुरू येथून अटक करण्यात आली. या धमकी प्रकरणाचा मुद्दा विधानसभेत (Vidhansabha) उपस्थित झाला त्यानंतर आदित्य ठाकरे यांच्यासह इतर मंत्री आणि नेत्यांना आलेल्या धमकीच्या संदर्भातही चर्चा झाली. या प्रकरणी आता ठाकरे सरकारने मोठा निर्णय घेतला आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करुन चौकशी करण्यात येणार असल्याचं गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walase Patil) यांनी सांगितलं आहे.

काय म्हणाले गृहमंत्री दिलीप वळसे पाटील?

दिलीप वळसे पाटील म्हणाले, सुनील प्रभू यांनी जो विषय उपस्थित केला ज्यामध्ये राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांना जी धमकी आली आहे त्या संदर्भात पोलिसांनी तपास केला असून जयसिंग बजरंसिंग राजपूत राहणार बंगळुरू, कर्नाटक येथे असल्याचं निष्पण्ण होताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि त्याला अटक केली. आरोपीला न्यायालयाने तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.

वाचा : सभागृहात जोरदार खडाजंगी; नितेश राणे - अनिल परब यांच्यात बाचाबाची, पाहा काय घडलं?

विधानसभा सदस्य असो किंवा सर्वसामान्य नागरिक असो सर्वांचे आयुष्य, त्याची सुरक्षितता ही तेवढीच महत्त्वाची आहे. म्हणून या सर्व विषयाची चौकशीसाठी मी राज्यस्तरावर एक एसआयटीची स्थापन करुन त्याच्या माध्यमातून आलेली धमकी, घडलेली घटना आणि भविष्यात करण्यात येणाऱ्या उपाययोजना या संदर्भात एक धोरण तयार करण्यात येईल. एसआयटी नेमून चौकशी करण्यात येईल.

मंत्री आदित्य ठाकरेंना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला अटक

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव आणि मंत्री आदित्य ठाकरे यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्याला पोलिसांनी अटक केली आहे. बंगळुरू येथून आरोपीला अटक करण्यात आली आहे. मुंबई पोलिसांच्या सायबर सेलने ही कारवाई केली आहे. आरोपी 34 वर्षीय असल्याची माहिती समोर आली आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांना 8 डिसेंबर रोजी व्हॉट्सअपवर एक मेसेज आला होता. या मेसेजच्या माध्यमातून आरोपीने मंत्री आदित्य ठाकरे यांन जीवे ठार मारण्याची धमकी दिली होती. तसेच अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या मृत्यूला जबाबदार धरत आरोप केले होते.

आरोपीने आपल्या मेसेजमधून आदित्य ठाकरेंवर सुशांत सिंह राजपूत याच्या मृत्यूबाबत आरोप केल होते. आरोपीने सुरुवातीला मंत्री आदित्य ठाकरे यांना फोन कॉल केला. मात्र, फोन रिसिव्ह न झाल्याने आरोपीने आदित्य ठाकरे यांना व्हॉ़ट्सअपवर धमकी देणारा मेसेज पाठवला.

First published:

Tags: Aaditya thackeray, Winter session, महाराष्ट्र