आधार असो की निवडणूक ओळखपत्र झटपट तयार करून देत होती गँग!

आधार असो की निवडणूक ओळखपत्र झटपट तयार करून देत होती गँग!

अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी शुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे, यात कुणाचा समावेश आहे या शोध सुरू आहे.

  • Share this:

मुंबई, 01 फेब्रुवारी : मुंबईमध्ये बनावट आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक कार्ड  आणि जन्ममृत्यू दाखला बनवून देणाऱ्या टोळीस मेघवाडी पोलिसांनी अटक केली आहे.  ह्या टोळीकडे  बोगस शासकीय कागदपत्रे बनवण्याची संपूर्ण साहित्य जप्त करण्यात आली आहे.

मुंबईच्या जोगेश्वरी पूर्वतील मेघवाडी पोलीस स्टेशनच्या हद्दीत बांद्रा प्लॉट इथं काही जणांची टोळी ही ग्राहकांना बोगस आधार कार्ड, पॅन कार्ड, निवडणूक कार्ड, जन्ममृत्यू दाखला इत्यादी बनवून देत होते, अशी महिती पोलिसांना मिळाली. त्याच माहितीच्या अनुषंगाने मेघवाडी पोलिसांनी सापळा रचून तीन ठिकाणी छापे मारले. या कारवाईत या टोळीच्या चार आरोपींना अटक करण्यात आली आहे.

पोलिसांनी या आरोपींकडून बोगस आधार कार्ड बनवायचे साहित्य आणि पॅनकार्ड, निवडणूक कार्ड, जन्म मृत्यू दाखला, बोगस कागदपत्र हस्तगत केली आहे. त्यांच्याकडे वरील कागदपत्रे तयार करण्यासाठी संपूर्ण यंत्रणा म्हणजे प्रिंटर कॉम्प्युटर, स्कॅनर आणि इतर मशिनरी जप्त करण्यात आली आहे.

अटक करण्यात आलेल्या आरोपींची कसून चौकशी शुरू असून या रॅकेटमध्ये आणखी कोण आहे, यात कुणाचा समावेश आहे या शोध सुरू आहे. तसंच या आरोपींनी किती जणांना अशाप्रकारे बोगस कागदपत्र  देऊन गंडा घातला आहे हे अजून समोर आले नाही.

'शादी डॉट कॉम'वरून महिलेला जाळ्यात ओढले, पण VIDEO CALL मुळे झाला भांडाफोड

दरम्यान,  सोशल मीडियावर विविध प्रकारच्या लग्न जुळणाऱ्या संस्थांच्या वेबसाइट उपलब्ध आहे. यापैकीच एक असलेले 'शादी डॉट कॉम' या साईटवर अमरावतीतील एका महिलेची मुंबईतल्या एका तरुणासोबत मैत्री झाली. या मैत्रीच्या माध्यमातून दोघांनी लग्न करण्याचे ठरवले. परंतु समोरच्या व्यक्तीने खोटे प्रोफाईल बनवून आणि कंत्राटदार असल्याचे सांगत एका महिलेला 26 लाखांचा चुना लावण्याचा धक्कादायक प्रकार अमरावतीत उघड झाला आहे.

अमरावती येथील पती पासून विभक्त झालेल्या महिलेने आयुष्याचा जोडीदार शोधण्यासाठी 'शादी डॉट कॉम' या वेबसाईटवर नोंदणी केली. यादरम्यान तिची मुंबई मधील अजयसिंग अग्रवाल या तरुणाशी ओळख झाली. दोघांचे बोलणे सुरू झाले. दोघांच्या मैत्रीला पालवी फुटत असतानाच अजयसिंगने पीडित महिलेला आपण कंत्राटदार असल्याची खोटी माहिती दिली. पण या माहितीवर विश्वास या महिलेने ठेवला.

आपल्याला या  व्यवसायात कंत्राटदाराकडून फसवणूक झाल्याचे सांगत आरोपीने या महिलेला पैशाची मागणी केली. अजय सिंगने आधी पंधरा ते वीस लाख रुपयांची गरज असल्याचे सांगितले. सुरुवातीला दोन लाख नंतर वीस लाख नंतर एक लाख नंतर नव्वद हजार आणि शेवटी दोन लाख असे एकूण सव्वीस लाख रुपयांचा चुना या आरोपीने महिलेने लावला.

First published: February 1, 2020, 10:30 PM IST

ताज्या बातम्या