आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांचा दिवाळीनंतर फैसला

अशोक चव्हाण आणि सीबीआय दोघांचाही आज युक्तीवाद संपला आहे. खटला चालवण्यास देण्यात आलेली परवानगी ही राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप चव्हाण यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

Sachin Salve | News18 Lokmat | Updated On: Sep 28, 2017 05:04 PM IST

आदर्श प्रकरणी अशोक चव्हाणांचा दिवाळीनंतर फैसला

28 सप्टेंबर : वादग्रस्त आदर्श इमारत प्रकरणात सीबीआयला खटला चालवण्याची परवानगी देण्याच्या राज्यपाल सी विद्यासागर राव यांच्या निर्णयाला आव्हान देणाऱ्या माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या याचिकेवर दिवाळीनंतर मुंबई हायकोर्ट आपला निर्णय देणार आहे.

अशोक चव्हाण आणि सीबीआय दोघांचाही आज युक्तीवाद संपला आहे. खटला चालवण्यास देण्यात आलेली परवानगी ही राजकीय हेतुने प्रेरित असल्याचा आरोप चव्हाण यांनी आपल्या याचिकेत केला आहे. सीबीआय राज्य सरकारच्या मर्जीप्रमाणे वागत असल्याचा आरोप चव्हाण यांनी आपल्या याचिकेत केला आहे.

खटला चालवण्यासाठी घटनात्मक आणि कायदेशीर अधिकारांचा वापर योग्य रितीनं केला गेला पाहिजे असं चव्हाण यांनी याचिकेत म्हटलं आहे. तर चव्हाणांविरोधात आमच्याकडे नवे पुरावे आहेत, या प्रकरणी स्थापन करण्यात आलेल्या समित्यांचा अहवाल, आणि हायकोर्टाचा या संदर्भातला निर्णय असल्यानं राज्यपालांच्या विरोधातलं चव्हाण यांचं म्हणणं मान्य केल्यास त्यांची या खटल्यातून सुटका होईल असा सीबीआयचा युक्तीवाद आहे. तसं झाल्यास आत्तापर्यंतची चौकशी निष्फळ ठरेल असंही सीबीआयनं म्हटलं आहे. तसंच जानेवारी २०१४ साली सीबीआय कोर्टात अशोक चव्हाण यांचं आरोपींच्या यादीतून नाव वगळणं ही आपली चूक होती असं सीबीआयनं या सुनावणीच्या दरम्यान मान्य केलंय. त्यामुळे दिवाळीनंतरच चव्हाण यांचा आता फैसला होणार आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Sep 28, 2017 05:04 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...