दिवाकर सिंग, प्रतिनिधी
मुंबई, 26 जानेवारी : प्रजासत्ताक दिनाचा उत्साह एकीकडे सुरू आहे. तर दुसरीकडे, राज्याचा गाडा जिथून हाकला जातो त्या मंत्रालयासमोर एका तरुणाने आत्महत्येचा प्रयत्न केला आहे. पण, वेळीच पोलिसांनी या तरुणाला ताब्यात घेतलं आहे. या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली आहे.
आज सकाळी मंत्रालयासमोर सुरेश मुंडे नावाच्या तरुणाने मंत्रालयासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पण वेळीच मरीन ड्राइव्ह पोलिसांनी सुरेश मुंडे या तरुणाला ताब्यात घेतलं. सुरेश मुंडे हा माजी सैनिक आहे. तो बीडचा राहणार आहे. बीड पोलीस हे फसवणूक प्रकरणामध्ये नेत्यांच्याविरोधात कोणतीही कारवाई करत नाही, त्यामुळे या तरुणाने मंत्रालयासमोर आत्महत्याचे प्रयत्न केला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. सुरेश मुंडे हा पोलिसांच्या ताब्यात असून चौकशी करत आहे.
(प्रकाश आंबेडकर म्हणतात शरद पवार भाजपचे, जयंत पाटलांनी स्पष्ट शब्दांत सुनावलं)
दरम्यान, सोलापूर शहरातील जिल्हा कृषी कार्यालयासमोर युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न केला आहे. प्रजासत्ताक दिनी युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यांकडून आत्मदहनाचा प्रयत्न करण्यात आला. सोलापूर जिल्ह्यातील बोगस खत कंपन्यांविरोधात कारवाई करावी या मागणीसाठी युवा भीम सेनेकडून आंदोलन करण्यात आले. सोलापूर जिल्हा कृषी अधिकाऱ्यांना जाग येण्यासाठी युवा भीम सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी कृषी कार्यालयाच्या इमारती समोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. पोलिसांनी मध्यस्थी करून आत्मदहन प्रयत्न करणाऱ्या पदाधिकाऱ्याला ताब्यात घेतले आहे. जिल्हा कृषी विभागाने बोगस खत कंपन्यांवर कारवाई केली नाही तर तीव्र आंदोलनाचा इशारा युवा भीम सेनेकडून देण्यात आला.
(केसरकरांकडून आदित्य ठाकरेंना संयमाचा सल्ला, ठाणे दौऱ्यावरून उद्धव ठाकरेंना टोला)
तर, बारामतीत प्रजासत्ताक दिनाच्या ठिकाणी एकाने आत्मदहनाचा प्रयत्न केला. आत्मदहन करणाऱ्या व्यक्तीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तालुक्यातील निरावागज येथील दत्तात्रेय शिवाजी भोसले याला पोलिसांनी ताब्यात घेतले. गावातील प्रश्नांबाबत होत असलेल्या अन्यायाची प्रशासनाने दखल न घेतल्याने आत्महत्येचा प्रयत्न केला.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.