महिला असुरक्षितच! मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण

महिला असुरक्षितच! मुंबईच्या धावत्या लोकलमध्ये महिलेला मारहाण

काल रात्री ११ वाजता एका अपंग व्यक्तीनं ठाण्याहून दादरला जाणारी लोकल पकडली. लोकल गाडीने वेग घेताच गाडीतील एका व्यक्तीने त्याच्या सोबत बसलेल्या महिलेला मारहाण करायला सुरूवात केली.

  • Share this:

06 एप्रिल : धावत्या लोकलमध्ये महिला एकमेकांशी मारहाण करतानाच्या अनेक व्हिडिओ आपण सोशल मीडियावर पाहिल्या आहेत. पण एक पुरूष धावत्या लोकलमध्ये एका महिलेला बेदम मारहाण करतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर सध्या व्हायरल झाला आहे. हा सगळा धक्कादायक प्रकार लोकलच्या अपंगांच्या डब्ब्यात घटला.

काल रात्री ११ वाजता एका अपंग व्यक्तीनं ठाण्याहून दादरला जाणारी लोकल पकडली. लोकल गाडीने वेग घेताच गाडीतील एका व्यक्तीने त्याच्या सोबत बसलेल्या महिलेला मारहाण करायला सुरूवात केली. स्वत:चा बचाव करण्यासाठी ती महिला रेल्वेच्या दरवाज्याजवळ सारखी धाव घेत होती. पण तो व्यक्ती तीला मारहाण करत पुन्हा आत ओढण्याचा प्रयत्न करत होता. ब-याच वेळ या दोघांमध्ये अशीच झटापट सुरु होती.

त्यानंतर हा व्हिडिओ शुट करणाऱ्या एका व्यक्तीने रेल्वे पोलिसांना फोन केला. आणि रेल्वे दादर येथे पोहचतात रेल्वे पोलिसांनी त्या व्यक्तीच्या मुसक्या आवळल्या. सध्या त्या व्यक्तीवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ती व्यक्ती आणि महिला प्रथम दर्शनी एकमेंकांना ओळखत असल्याची माहिती समोर आली आहे. ज्या व्यक्तीने हा व्हिडिओ शुट केला ती व्यक्ती अपंग असल्यानं तो त्या महिलेच्या बचावाकरता जाऊ शकला नाही.

First published: April 6, 2018, 2:25 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading