मुंबई 12 सप्टेंबर: आज जे. जे. रुग्णालयात एका महिलेने एकाचवेळी चार मुलांना जन्म दिला आहे. नवजात शिशू विभागामध्ये महिनाभर त्यांची काळजी घेतल्यानंतर, उपचार केल्यानंतर बाळ व बाळंतीण सुखरूप झाल्याची खात्री पटल्यानंतर त्यांना रविवारी डिस्चार्ज देण्यात आला.
जहानरा शेख असं या महिलेचं नाव अाहे. ती 29 वर्षांची आहे. जहानाराने सात ऑगस्टला एक मुलगा व तीन मुलींना जन्म दिला. जहानरा नाशिकची असून गेल्या पाच महिन्यांपासून उपचारासाठी जे. जे. रूग्णालयात येत होती. जे.जे हॉस्पिटलमध्ये जुळे नाही तिळे नाही चक्क चार मुलांना तिने जन्म दिला आहे.
बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला , टि्वटरवर आणि जी प्लस फाॅलो करा