मराठी बातम्या /बातम्या /मुंबई /मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; एका तासाच्या रेस्क्यूनंतर चालकाची सुखरुप सुटका

मुंबईत अपघाताचा थरार, वाळूचा ट्रक रिक्षावर पलटला; एका तासाच्या रेस्क्यूनंतर चालकाची सुखरुप सुटका

truck accident

truck accident

मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर दोघे वाळूखाली दबले गेले होते.

मुंबई, 16 जानेवारी: मुंबईमधील जोगेश्वरी विक्रोळी लिंक रोडवर रात्री उशीरा भीषण अपघात झाला. वाळूनी भरलेला ट्रक एका रिक्षावर पलटी झाला. अपघातामध्ये रिक्षासह ड्रायव्हर दोघे वाळूखाली दबले गेले होते. घटनास्थळी स्थानिक नागरिक उपस्थित होते. पोलिस आणि नागरिकांच्या मदतीने वाळूखाली दबले गेलेल्या रिक्षा चालकाला बाहेर काढण्यात एक तासानंतर यश आले. रिक्षा चालकाची प्रकृती चिंताजनक आहे.

मिळालेल्या माहितीनुसार रात्री 12 वाजता वाळूनी भरलेला ट्रक पवईकडे भरधाव जात होता. मात्र, ट्रकचालकाला आपले नियंत्रण ठेवता आले नाही. ट्रक शेजारून रिक्षा जात होती. त्यावर ट्रक पलटी झाला. या अपघातानंतर घटनास्थळी पोलिस दाखल झाले.

घटनास्थळी उपस्थित स्थानिक नागरिक आणि पोलिसांच्या मदतीने तासाभराच्या अथक परिश्रमानंतर जेसीबी आणि क्रेन मशिनद्वारे रिक्षाचालकाला बाहेर काढण्यात आले, रिक्षाचालकाची प्रकृती चिंताजनक आहे.

एकीकडे ऑटोचालकाची प्रकृती चिंताजनक असतानाच ऑटोरिक्षाचेही मोठे नुकसान झाले आहे.

First published:

Tags: Truck accident