Home /News /mumbai /

भिवंडीत बर्निंग ट्रकचा थरार! ड्रायव्हर आणि क्लिनरने भीषण आगीतून बाहेर टाकल्या उड्या VIDEO

भिवंडीत बर्निंग ट्रकचा थरार! ड्रायव्हर आणि क्लिनरने भीषण आगीतून बाहेर टाकल्या उड्या VIDEO

या आगीत ट्रकचा केवळ सांगाडा वाचला आहे. ट्रकला भीषण आग लागल्याने ट्रकमधील केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे तागे व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा लाखो रुपयांचा माल ट्रकसह जळून खाक झाला आहे.

भिवंडी 06 ऑक्टोबर: भिवंडीतील अंजूरफाटा चिंचोटी महामार्गावरील डुंगे गावाच्या हद्दीत एका चढणीवर भरधाव ट्रकला भीषण आग लागली. या आगीमध्ये ट्रकसह कोरोसिव्ह केमिकल पावडरचे ड्रम व कापडाचे तागे जळून खाक झाले. ट्रकला आग लागल्याचे लक्षात येताच क्लिनर व ड्रायव्हरने जिवाच्या आतांकाने ट्रकमधून उड्या टाकल्या. आणि ते घटनास्थळावरून पळून गेल्याने बचावले. ट्रक क्र. HR 38 Y- 31364 यामध्ये ट्रक चालकाने भिवंडीतील गोदामातून केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे तागे व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा माल भरून तो खाली करण्यासाठी गुजरात येथे चालला होता. त्यावेळी भरधाव ट्रक डुंगे गावच्या हद्दीतील एका चढणीवर असताना चालकाचा ट्रकवरील ताबा सुटून ट्रक पलटी झाला. त्यावेळी ट्रकला भीषण आग लागल्याने ट्रकमधील केमिकल पावडरचे ड्रम, कापडाचे तागे व अन्य वेगवेगळ्या प्रकारचा लाखो रुपयांचा माल ट्रकसह जळून खाक झाला आहे. या आगीत ट्रकचा केवळ सांगाडा वाचला आहे. या आगीच्या घटनेची माहिती भिवंडी अग्निशमन दलास मिळताच अंजूर फाटा व इंदिरा गांधी रुग्णालया लगतच्या दोन फायर ब्रिगेडच्या गाड्या तात्काळ रवाना घटनास्थळी दाखल झाल्या मात्र त्या पोहोचेपर्यंत ट्रकसह संपूर्ण सामान जळून खाक झाले होते.
Published by:Ajay Kautikwar
First published:

पुढील बातम्या