• Home
  • »
  • News
  • »
  • mumbai
  • »
  • BREAKING : समीर वानखेडेंवर मोठी नामुष्की, एकूण 6 प्रकरणं घेतली काढून!

BREAKING : समीर वानखेडेंवर मोठी नामुष्की, एकूण 6 प्रकरणं घेतली काढून!

ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत.

ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत.

ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत.

  • Share this:
    मुंबई, 05 नोव्हेंबर : मुंबई क्रुझ ड्रग्स पार्टी प्रकरणी आर्यन खानला अटक (Aryan Khan arrest case) केल्यामुळे  अंमली विरोधी पथक अर्थात एनसीबीचे (ncb) मुंबई विभागाचे अधिकारी समीर वानखेडे (sameer wankhede) यांच्यावर अनेक गंभीर आरोप झाले आहे. अखेर आर्यन खान अटक प्रकरणासह आणखी 6 प्रकरणे समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आली आहे. त्यामुळे वानखेडेंना हा मोठा धक्का बसला आहे. आर्यन खान अटक प्रकरणामुळे एनसीबीला अनेक गंभीर आरोपांना सामोरं जावं लागलं. समीर वानखेडे यांच्यावर राष्ट्रवादीचे नेते आणि अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी पुराव्यानिशी गंभीर आरोप केले होते. त्यानंतर एनसीबीने या प्रकरणी पहिल्यांदाच मोठे पाऊल उचलले आहे. आर्यन खान प्रकरण समीर वानखेडेंकडून काढून घेण्यात आले पण आणखी 6 प्रकरणं काढली आहे.

    पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट

    या आठवड्याच्या सुरुवातीला जारी केलेल्या आदेशात डीजी एनसीबीने मुंबई झोनल युनिटमधून 6 प्रकरणे सेंट्रल युनिटकडे हस्तांतरित केली. ही पाच प्रकरणे राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरील आहेत आणि जिथे आंतरराज्यीय संबंध गुंतलेले आहेत. आर्यन खान, समीर खान या प्रकरणासह अरमान कोहली, इकबाल कासकर, कश्मीर ड्रग्स प्रकरणासह एकूण 6 प्रकरणाचा तपास दिल्ली एनसीबी करणार आहे. अरमान खान आणि आर्यन खान सारखी ही काही बॉलिवूड प्रकरणे आहेत. आता वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय सिंह या प्रकरणाचा तपास पाहणार आहे.  संजय सिंग एनसीबीमध्ये डीडीजी ऑपरेशन्स आहेत. ही संवेदनशील प्रकरणे हलवण्यात आली आहे. या प्रकरणाचा संपूर्ण नव्याने तपास पुराव्यानिशी केला जाणार असल्याची माहितीसमोर आली आहे. पॉर्नस्टार मिया खलिफा घेते `ही` विशेष ट्रिटमेंट सेंट्रल युनिट मॉनिटरिंगमुळे आर्यन खानसारख्या हायप्रोफाईल प्रकरणांबद्दलचा अनावश्यक वाद टाळता येईल, अशी भूमिका एनसीबीने घेतली आहे. या प्रकरणातून समीर वानखेडे यांना हटवण्यात आल्यानंतर या प्रकरणाचा टेकओव्हर चौकशीसाठी संजय सिंह उद्या टीमसह मुंबईत पोहोचण्याची शक्यता आहे.
    Published by:sachin Salve
    First published: