तीन वर्षाचा मुलगा खेळताना पडला गटारात, अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू

तीन वर्षाचा मुलगा खेळताना पडला गटारात, अग्निशमन दलाचे बचावकार्य सुरू

चिमुकल्या मुलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी विनयकुमार राठोड यांनी माध्यमांना दिली आहे. तर घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झालं आहे.

  • Share this:

मुंबई, 11 जुलै : यंदाच्या पावसामुळे मुंबईमध्ये मोठी जीवितहानी झाली. घराच्या, दुकानाच्या भींती कोसळल्यामुळे अनेकांनी आपले प्राण गमावले. त्यात एक धक्कादायक प्रकार घडला आहे. गोरेगावमधील आंबेडकर नगरातील नाल्यामध्ये 3 वर्षाच्या मुलगा पडली असल्याची माहिती देण्यात आली आहे. त्याला शोधण्यासाठी तात्काळ अग्निशमन दल आणि पोलीस दाखल झाले. तब्बल 7 तास  रेस्क्यू ऑपरेशन सुरू असल्याची माहिती अग्निशमन दलाकडून देण्यात आली आहे.

काल रात्री पावणे दहाच्या सुमारास दिव्यांश घरून बाहेर रस्त्यावर येत असताना तो उघड्या नाल्यात पडला आणि वाहून गेला. त्या आधी मुसळधार पाऊस पडून गेला होता त्यामुळे नाल्यात पाण्याचा प्रवाह जोरात होता. दिव्यांशला शोधत आलेल्या त्याच्या आईला तो कुठे दिसला नाही म्हणून शोध घेतला असता, सीसीटीव्ही मधून तो नाल्यात पडल्याचे समोर आलं. रात्रभर दिव्यांशला शोधण्यासाठी अग्निशमन दल, पोलीस आणि स्थानिक शर्थीचे प्रयत्न करत होते मात्र तो सापडला नाही. अग्निशमन दलाकडून त्याची शोधमोहीम सुरू आहे. एक क्षण नजर चुकवून घराबाहेर आलेला दिव्यांशवर ही वेळ ओढवेल असं कुणाला वाटलंही नव्हतं.

मुंबईमध्ये अनेक गटारांची झाकणं उघडी आहेत त्यामुळे प्रवाशांनी सांभाळून प्रवास करा अशी बातमी आम्ही लावली. पण खेळत असताना हा चिमुकला गटारात पडला. पावसामुळे सगळी गटारं भरली आहेत. त्यामुळे त्याला शोधण्याचे शर्तीचे प्रयत्न अग्निशमन दल आणि पोलिसांकडून करण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी पोहोचले. दिंडोशी पोलिसही सोबत घटनास्थळी दाखल झाले. त्यांच्याकडून मुलाला शोधण्याचे अद्यापही प्रयत्न सुरू असल्याची माहिती आहे.

दरम्यान, चिमुकल्या मुलाला वाचवण्यासाठी बचावकार्य सुरू करण्यात आल्याची माहिती डीसीपी विनयकुमार राठोड यांनी माध्यमांना दिली आहे. तर घटनास्थळी जेसीबीने गटार फोडण्याचे काम सुरू झालं आहे. झालेल्या प्रकारामुळे संपूर्ण परिसरात मोठी गर्दी झाली आहे. त्यामुळे गर्दीला आवरण्याचं कामही पोलिसांकडून करण्यात आहे.

मुंबईकरांनो सावधान, रस्त्यावर आहे 50पेक्षा अधिक मृत्यूचे सापळे!

दोन वर्षापूर्वी पावसाचं पाणी घरात शिरू नये म्हणून एल्फिस्टन परिसरातील नागरिकांनी मॅनहोलचं झाकणं बाजूला केलं. त्यात पडून डॉ. दीपक अमरापूरकर यांचा मृत्यू झाला. एका मॅनहोलचं  झाकणं उघडण्याने इतका मोठा अनर्थ घडला तर विचार करा जेव्हा सगळ्या रस्त्यावरच्या मॅनहोल उघडे पडले तर काय होईल? त्यामुळे मुंबईकरांनो तुमच्या जीवाला रस्त्यांवरून चालतानाही धोका आहे.

मुंबईच्या कुर्ला ते सायन या परिसरातील लाल बहाद्दूर शास्त्री रस्त्यावरची मॅनहोलची झाकणं ही वजनाला हलकी असल्याने ऐन पावसात पाण्याच्या दबावामुळे मॅनहोलच्या बाजूला पडतात. त्यामुळे मॅनहोल उघडी पडतात. लोखंडी झाकणं चोरीला जात असल्याने बीएमसीने संपूर्ण एलबीएस रोडला एफआरपीची झाकणं बसवून घेतली आहेत. पण त्यातली 50हुन अधिक झाकणं ही मिठी लगतच्या पट्याच्या जवळ येतात.

एकीकडे कोठीची पातळी आणि दुसरीकडे आभाळातून पडणाऱ्या पावसाचा दाब यामुळे ही हलकी झाकणं निघून जातात आणि तयार होतात ते मृत्यूचे सापळे. स्थानिक नगरसेविका सईदा खान यांनी याबाबत महापालिकेला पत्र लिहिले असून ताबडतोब ही झाकणं बदलण्यात यावी अशी मागणी केली आहे.

या मागणीवर पालिका अंमलबजावणी कधी करणार याचं काही सांगता येत नाही. पण मुंबईकरांनो, तोपर्यंत तुमची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार आहे. रस्त्यांवर चालताना कुठे खड्डे किंवा गटारं उघडी तर नाहीत ना याची नक्की काळजी घ्या.

SPECIAL REPORT: पावसाचं रौद्ररूप! 'या' देशांना पावसाचा मोठा तडाखा

First published: July 11, 2019, 7:45 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading