Home /News /mumbai /

करोनाचा धोका लक्षात घेऊन ठाण्यातही उभं राहाणार 1000 बेडचं तात्पुरतं हॉस्पिटल

करोनाचा धोका लक्षात घेऊन ठाण्यातही उभं राहाणार 1000 बेडचं तात्पुरतं हॉस्पिटल

या ठिकाणी 500 बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, 500 बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत.

    ठाणे 04 मे: करोनाशी लढा देण्यासाठी मुंबईत वांद्रे-कुर्ला काँप्लेक्समध्ये उभारण्यात येणाऱ्या रुग्णालयाच्या धर्तीवर ठाण्यातही येत्या तीन आठवड्यांत 1000 बेडचे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. चीनमधल्या वुहानमध्ये जसे हॉस्पिटल उभारण्यात आले होते त्याच धर्तीवर मुंबई आणि ठाण्यात हे हॉस्पिटल उभं राहात आहे. नगरविकासमंत्री आणि ठाणे जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेला याबाबत आदेश दिलेत. ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर या तात्पुरत्या रुग्णालयात करण्याचा निर्णयही घेण्यात आला. ठाणे महापालिका हद्दीत करोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा आढावा शिंदे यांनी सोमवारी ठाणे महापालिकेतल्या बैठकीत घेतला. यावेळी महापौर नरेश म्हस्के, आयुक्त विजय सिंघल यांच्यासह महत्त्वाचे अधिकारी आणि डॉक्टर्स उपस्थित होते. केंद्रीय  पथकाने काही दिवसांपूर्वी ठाण्यात भेट देऊन करोनाचा प्रतिबंध करण्यासाठी राबवण्यात येणाऱ्या उपाययोजनांची पाहणी केली होती. या पथकाने रुग्णसंख्या वाढण्याबाबत व्यक्त केलेल्या अंदाजाची दखल घेऊन त्यानुसार उपाययोजनांची व्याप्ती वाढवण्याचे निर्देश शिंदे यांनी बैठकीत दिले. इन्स्टिट्युशनल क्वारंटाइन, असिम्प्टोमॅटिक रुग्ण आणि क्रिटिकल रुग्ण यांची योग्य विभागणी करून आवश्यक उपचार केले जावेत. रुग्णसंख्या वाढू नये, यासाठी कंटेनमेंट एरियामध्ये निर्बंधांचे काटेकोर पालन करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. तसेच, मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी दक्षता बाळगून वेळीच उपाय करण्याची सूचनाही केली. हे वाचा- जर्मनीत कोरोनाचा पुन्हा उद्रेक होण्याची शक्यता, जगात 2.50 लाख मृत्यू करोनावर उपचार करण्यासाठी वैद्यकीय क्षमता कमी पडू नये, यासाठी ठाणे महापालिकेच्या ग्लोबल इम्पॅक्ट हबचे रुपांतर तात्पुरत्या स्वरुपात 1000 बेडच्या रुग्णालयात करण्याबाबत आजच्या बैठकीत सविस्तर चर्चा झाली. तीन आठवड्यांच्या आत हे रुग्णालय उभारण्यात येणार आहे. हे वाचा-  ‘आम्ही फक्त मरणाची वाट पाहतोय’, या देशात कोरोनाच्या ‘त्सुनामी’ची शक्यता या ठिकाणी 500 बेड ऑक्सिजनच्या व्यवस्थेसह, 500 बेड विना ऑक्सिजन, तसेच आयसीयू, पॅथॉलॉजिकल लॅब, एक्स रे, फीवर क्लिनिक आदी सुविधाही पुरवण्यात येणार आहेत. महापालिकेच्या माध्यमातून उभारण्यात येणाऱ्या या रुग्णालयासाठी आवश्यक ते तांत्रिक सहकार्य ज्युपिटर हॉस्पिटल करणार आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या