Home /News /mumbai /

मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

मुंबईत 64,700 लोकसंख्येसाठी एकच दवाखाना; प्रजा फाऊंडेशनच्या अहवालातून धक्कादायक माहिती उघड

2020 पासून मुंबईत मृत्युच्या कारणांची माहिती दिली जात नाही. मुंबईत 64,700 लोकसंखेसाठी एक दवाखाना आहे. मुंबईत आजही 1 लाख लोकसंख्येमागे 298 जणांना टिबी होत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे.

    मुंबई, 16 डिसेंबर : प्रजा फाउंडेशनकडून (Praja Foundation) आमदारांच्या कामाचा अहवाल सादर करण्यात आला आहे. या अहवालातून मुंबईतील लोकसंख्या आणि रुग्णालयांचे व्यस्त प्रमाण दिसून येत आहे. 2020 पासून मुंबईत मृत्युच्या कारणांची माहिती दिली जात नाही. मुंबईत 64,700 लोकसंखेसाठी एक दवाखाना आहे. मुंबईत आजही 1 लाख लोकसंख्येमागे 298 जणांना टिबी होत असल्याची धक्कादायक माहिती या अहवालातून समोर आली आहे. प्रजा फाउंडेशन ही एनजीओ दरवर्षी नगरसेवक (Corporater) आणि आमदार (MLA) यांनी केलेल्या कामाचा वार्षिक अहवाल प्रगती पुस्तकरूपाने प्रसिद्ध करते. माहितीच्या अधिकारातून देण्यात आलेल्या माहितीवर आधारित हे प्रगतीपुस्तक तयार होते. आज विधानमंडळातील कामाविषयी माहिती प्रसिद्ध करण्यात आली आहे. गेल्या दोन वर्षात विधीमंडळात अधिवेशने ही खूपच कमी कालावधीसाठी झाली आहेत. त्यामुळे आम्ही आमदारांचे रिपोर्ट कार्ड (Report Card) तयार केलेले नाही, असे प्रजा फाउंडेशनकडून सांगण्यात आले. मात्र, गेल्या तीन विधानसभांच्या कामकाजाचा लेखाजोखा मांडला आहे. गेल्या दोन वर्षात केवळ 22 दिवस अधिवेशन चालले. गेल्या दोन विधानसभांच्या सुरुवातीच्या सत्राच्या तुलनेत हे कामकाज खूप कमी आहे. हे वाचा - Bullock Cart Race : राज्यात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी; मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केला आनंद कोरोना कालावधीत आरोग्यावर विचारलेल्या प्रश्नात 62 टक्क्यांचे कमतरता आली आहे. शिक्षण विषयक प्रश्नांवर वर 78 टक्के आणि गृह विषयावर विचारलेल्या प्रश्नात 53 टक्यांची कमतरता आली आहे. सर्व आमदारांनी प्रश्न विचारले असले असले तरी रमेश लटके-1, विद्या ठाकूर -3 आणि प्रकाश सुर्वे यांनी केवळ 6 प्रश्न विचारले आहेत. नोकरी आणि उत्तम प्रशासनाचे आश्वासन देणाऱ्या राजकीय पक्षांमध्ये शिवसेना वगळता एकाही पक्षाने याबाबत अधिवेशनात प्रश्न विचारलेला नाही.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Mumbai, Mumbai local

    पुढील बातम्या