महिनाभरातच कोरोनाची दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, अखेर राजेश टोपेंनी सोडलं मौन

महिनाभरातच कोरोनाची दुसरी लस; आरोग्यमंत्र्यावर टीकेचा भडिमार, अखेर राजेश टोपेंनी सोडलं मौन

सर्वसामान्यांना दोन लशींमध्ये 2 ते 3 महिन्यांचा अवधी वाढवला जात असताना आरोग्यमंत्र्यांनी एका महिन्यात लस कशी घेतली?

  • Share this:

मुंबई, 18 मे : गेल्या काही दिवसांपासून राज्यातील रुग्णसंख्या कमी होत असताना दिसत आहे. मात्र दुसरीकडे अनेक ठिकाणी लसीकरणाला ब्रेक लागला आहे. पुरेशा लशी उपलब्ध नसल्याची कारणं दिली जात आहे. लोकांची चिंता वाढवणारा कोरोना रोखण्यासाठी लसीकरणाचा वेग वाढविण्याची मागणी सर्वसामान्य नागरिकांकडून केली जात आहे. मात्र दोन लसीकरणाच्या मात्रा घेण्यासाठीचा कालावधी वाढविला गेला आहे. या कारणावरुन राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यावर टीका केली जात आहे.

राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज लस घेतली. त्यानंतर सोशल मीडियावर यावरून टोपे विरोधात नाराजी सुरू झाली आहे. एक महिन्याचा कालावधी पू्र्ण होताच दुसरी लस कशी घेतली? म्हणून प्रश्न उपस्थितीत केले जात आहे. प्रोटोकॉलनुसार लस घेण्यासाठीचा कालावधी नव्या बदलानुसार साधारण तीन महिने करण्यात आला आहे. परंतू त्याआधीच आरोग्यमंत्री लस कसे घेतात, असा सवाल सोशल मीडियावर विचारला जात आहे. याबाबत टोपे यांच्या कार्यालय याबाबत विचारणा केली असता त्यांनी सांगितलं की, आरोग्यमंत्री यांनी कोव्हीशिल्ड नाही तर कोव्हॅक्सिन लस घेतली यामुळे 30 दिवस कालावधी नंतर दुसरी लस घेतली.

ही वाचा-पुण्यात म्युकरमायकोसीसच्या इंजेक्शनचा मोठा तुटवडा, रुग्णांच्या नातेवाईकांची फरफट

हे ही वाचा-कोरोना लशीसाठी CoWin वर नोंदणीसाठी अडचण येतेय?तुमच्यासाठी मदतशीर ठरेल हे नवं App

महाराष्ट्रातील कोरोनाची परिस्थिती पाहता, राज्यात कोरोना रुग्णसंख्येच कमालीची घट झाली आहे. कधी 50 हजारांच्या वर नवे रुग्ण सापडत होते ते प्रमाण आता 30 हजारांच्या खाली आलं आहे. अॅक्टिव्ह रुग्णसंख्याही कमी झाली आहे. राज्यात आता 4 लाख 15 हजार रुग्ण उपचार घेत आहेत. नवे रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्ण कमी झाले असले तरी मृत्यूच्या आकड्याने मात्र चिंता वाढवली आहे. दिवसभरात  679 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहे.

Published by: Meenal Gangurde
First published: May 18, 2021, 9:31 PM IST

ताज्या बातम्या