Facebookच्या आयर्लंड ऑफिसमधून आला फोन, 6 तासांच्या थरार नाट्यानंतर मुंबईत तरुणाचा वाचला जीव

Facebookच्या आयर्लंड ऑफिसमधून आला फोन, 6 तासांच्या थरार नाट्यानंतर मुंबईत तरुणाचा वाचला जीव

एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना आहे. रात्री साडेसातच्या सुमारात सुरु झालेलं हे थरार नाट्य पहाटे तीनच्या सुमारास संपलं.

  • Share this:

मुंबई 9 ऑगस्ट: सोशल मीडियामुळे (Social Media) खऱ्या अर्थाने सर्व जग जवळ आलं असं म्हटलं जातं. फेसबुकवर (Fcebook) तर एक वेगळच विश्व असल्याचंही कायम म्हटलं जातं. त्याचा प्रत्यय नुकताच मुंबईत आला. फेसबुकने घेतलेला पुढाकार आणि सायबर पोलिसांची तत्परता, 6 तास पोलिसांनी घेतलेला शोध यामुळे मुंबईत आत्महत्येच्या विचारात असलेल्या एका तरुणाचे प्राण वाचले आहेत. एखाद्या चित्रपटात शोभावी अशी ही घटना आहे.

फेसबुकवर सर्च होणाऱ्या माहितीच्या आधारे Facebookच्या आयर्लंड ऑफिसमधून दिल्ली पोलिसांच्या सायबर विभागात एक फोन आला. फेसबुकवरचा एक युवक आत्महत्येच्या विचार करत असल्याचं कळतं अशी माहिती देत त्यांनी फोन नंबरही कळवला. रात्री साडेसातच्या सुमारास हा फोन आला. फोन नंबर हा दिल्लीचाच असल्याने सायबर विभागाने संबंधित अधिकाऱ्यांना कळवला. त्या अधिकाऱ्याने फोन नंबवरवरून त्या घराचा छडा लावला आणि चौकशी केली असता. तो तरुण मुंबईत गेल्याचं त्याच्या पत्नीने सांगितलं. मात्र त्याचा पत्ता तिला माहित नव्हता.

तो घरातून भांडून 15 दिवसांपूर्वीच मुंबईत गेल्याची माहितीही त्यांनी दिली. दिल्ली सायबर विभागाने ही माहिती मुंबई पोलिसांच्या सायबर विभागाला दिली. सायबर विभागाच्या प्रमुख रश्मी करंदीकर आणि त्यांच्या टीमने  तरुणाच्या फोनवरून त्याचं लोकेशन ट्रेस केलं. मात्र त्याचा फोन काही लागत नव्हता.

अमेरिकेला अंगावर घेणारा इराणचा सर्वोच्च धार्मिक नेता आता हिंदीतून साधणार संवाद

अनेकदा  प्रयत्न केल्यानंतर त्याचा फोन एकदाचा लागला तेव्हा पोलिसांनी त्याला बोलण्यात गुंतवून ठेवलं. लोकेशन हे भाईंदरचं आहे हे कळाल्यानंतर त्याची माहिती भाईंदर पोलिसांना दिली. पोलीस लगेच त्याच्या रुमपर्यंत गेले आणि त्याला शोधून काढलं, त्याची विचारपूस केली. तेव्हा त्यांना सगळी माहिती कळाली. लॉकडाऊनमुळे त्याची शेफची नोकरी गेली होती. त्याला नुकताच मुलगाही झाला होता.

भीषण विमान अपघातानंतर केरळला आणखी मोठा धक्का, ड्रोन VIDEO पाहून भरेल धडकी

त्यात बायकोशी भांडण झाल्याने तो रागाने मुंबईत परतला होता. घर कसं चालेल या विवंचनेत असतांनाच त्याच्या मनात आत्महत्येचे विचार येत होते. त्यातून त्याने फेसबुकवर काही माहिती सर्च केली होती. त्यावर फेसबुकला हा युवक आत्महत्येचा विचार करत असल्याचा संशय आला आणि त्यांनी लगेच त्याची माहिती दिली आणि पहाटे तीनच्या सुमारास हे थरार नाट्य संपलं आणि एका तरुणाचा जीव वाचला.

Published by: Ajay Kautikwar
First published: August 9, 2020, 11:43 PM IST
Tags: Facebook

ताज्या बातम्या