ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा मृत्यू

ट्रेन सुरू झाल्यानंतर या प्रवाशाने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेल्यानं ट्रेन आणि रेल्वे प्लॅटफॉर्ममध्ये सापडल्यानं जागीच चिरडला गेला.

Sonali Deshpande | News18 Lokmat | Updated On: Jul 8, 2017 01:31 PM IST

ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात प्रवाशाचा मृत्यू

मुंबई, 8 जुलै: मुंबईत चालत्या ट्रेनमध्ये चढण्याच्या प्रयत्नात एका प्रवाशाचा जीव गेलाय. बोरीवली स्टेशनवर ही धक्कादायक घटना घडलीय.

ही ट्रेन मुंबईहून अहमदाबादला जात होती. त्यावेळी ट्रेन सुरू झाल्यानंतर या प्रवाशाने डब्यात चढण्याचा प्रयत्न केला पण त्याचा तोल गेल्यानं ट्रेन आणि रेल्वे  प्लॅटफॉर्ममध्ये सापडल्यानं जागीच चिरडला गेला. या घटनेचं सीसीटीव्ही दृश्य अक्षरशः अंगावर काटा आणणारं आहे. या दुर्घटनेत मरण पावलेला व्यक्ती मुंबईहून अहमदाबादला निघाला होता.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jul 8, 2017 01:30 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...