ठाणे, 11 जानेवारी : मासिक पाळी (menstrual periods) आणि तिच्याशी जोडलेला स्टिग्मा यामुळे स्त्रियांना सतत अडचणींचा (problems) सामना करावा लागतो. आता मात्र महाराष्ट्रातून (Maharashtra) एक सुखद बातमी मासिक पाळीबाबत समोर येते आहे. महाराष्ट्रातील मुंबईच्या जवळ ठाणे (Thane) भागातलं हे विधायक वास्तव आहे. ठाण्यातील झोपडपट्टीतील (slum) महिलांना मासिक पाळीमध्ये येणाऱ्या समस्या सोडवता याव्यात यासाठी एक 'पिरियड रूम' (period room) बनवली गेली आहे. सार्वजनिक शौचालयात (public toilets) बनवलेली ही पिरियड रूम महिलांसाठी खूप मोलाची ठरेल असं चित्र आहे.
एका महापालिकेच्या (Municipal corporation) अधिकाऱ्यानं सांगितलं, की सार्वजनिक शौचालयात असा कक्ष बनण्याचा हा पहिलाच प्रयोग आहे. या कक्षात एक कमोड, जेट स्प्रे, टॉयलेट रोल होल्डर, साबण, पाणी यांची व्यवस्था आहे. शिवाय एक कचऱ्याचा डब्बाही (dustbin) तिथं आहे. अधिकारी म्हणाले, की या कक्षाचं निर्माण बऱ्याच काळापासून करायचं होतं. ठाणे महापालिकेनं एका स्वयंसेवी संस्थेसोबत एकत्र येत हा कक्ष बनवला आहे. या सोमवारी वागळे इस्टेटच्या (Wagle estate) शांतीनगर भागातला हा कक्ष महिलांसाठी खुला केला गेला.
हे ही वाचा-काय सांगता? नवऱ्यानं बायकोला दिली चंद्रावर जमीन गिफ्ट!
या कक्षाच्या बाहेरील भिंतींवर आकर्षक रंग दिला आहे. सोबतच मासिक पाळीच्या दरम्यान काय करावं याचा संदेश देणारी चित्रंही या भिंतींवर काढलेली आहेत. या अधिकाऱ्यानं सांगितलं, 'या केंद्राच्या उभारणीसाठी 45 हजार रुपयांचा खर्च आला. आता ठाणे शहरातल्या सर्व 120 टॉयलेट्समध्ये असे कक्ष बनवले जाणार आहेत.' महिला लहान घरात राहतात. इथं अंघोळीसाठीही वेगळी व्यवस्था नाही. मासिक पाळीदरम्यान या महिलांना सॅनिटरी नॅपकिन बदलायलाही खूप अडचणी येतात. अधिकाऱ्यांच्या मते हे सुविधा केंद्र या महिलांसाठी एक वरदान असेल. त्यातून स्वच्छतेलाही प्रोत्साहन मिळेल.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Periods, Thane (City/Town/Village)