Home /News /mumbai /

दीड वर्षांची स्वीटी घराबाहेर खेळत होती आणि अचानक...

दीड वर्षांची स्वीटी घराबाहेर खेळत होती आणि अचानक...

गेल्यावर्षी धानीव बाग परिसरात चार वर्षीय चिमुरड्याचा अशाच प्रकारे उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता.

नालासोपारा, 20 ऑगस्ट : नालासोपारा पूर्वेकडील धानीवबाग परिसरात एका दीड वर्षीय चिमुरडीचा उघड्या गटारात पडून मृत्यू झाल्याची मन हेलावून टाकणारी घटना उघडकीस आली आहे. स्वीटी वीरेंद्र पाल असं या चिमुरडीचे नाव आहे. दीड वर्षांची स्वीटी बुधवारी रात्री घराबाहेर खेळण्यासाठी आली होती. काही वेळाने ती दिसेनाशी झाल्याने तिच्या कुटुंबीयांनी आणि स्थानिकांनी तिचा  शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, तिचा कुठेच शोध लागला नाही. अखेर तासानंतर  परिसरातील उघड्या गटारात तिचा मृतदेह सापडला. दीड वर्षांच्या स्वीटीचा मृतदेह पाहून कुटुंबीयांनी एकच आक्रोश केला. मोठी बातमी, काँग्रेसचे मंत्री नितीन राऊतांची गाडी उत्तर प्रदेश पोलिसांनी अडवली गेल्यावर्षी धानीव बाग  परिसरात चार वर्षीय चिमुरड्याचा अशाच प्रकारे  उघड्या गटारात पडून मृत्यू झाला होता. मात्र, त्यांनतरही महापालिकेच्या वतीने उघड्या गटारांवर झाकणे लावली गेली नाहीत. त्यामुळे  महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे चिमुकलीचा बळी गेल्याचा आरोप कुटुंबीयांनी केला आहे. पती आणि मुलांना रात्री संपवलं, सकाळी फुलं वाहिली आणि...डॉ. राणेनं असं का केलं? महापालिकेच्या हलगर्जीपणामुळे गेल्या वर्षी देखील एका मुलाचा मृत्यू झाला होता त्यामुळे महापालिकेच्या कार्यपद्धतीवर प्रश्न निर्माण होत आहेत.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या