Home /News /mumbai /

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

पाणी पिण्याच्या बहाण्याने घरात घुसून शेजाऱ्याने केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

भिंवडी शहरालगत आसलेल्या खाडीपार इथं ही घटना घडली

    रवी शिंदे, प्रतिनिधी भिवंडी, 01 जानेवारी : महिलांवरील अत्याचाराच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत चालली आहे. भिंवडीमध्ये शेजारच्या घरात पिण्यासाठी पाणी मागण्याच्या बहाण्याने घरात घुसून एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणी  आरोपी नराधमाला पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहे. भिंवडी शहरालगत आसलेल्या खाडीपार इथं ही घटना घडली. शाहनवाज अन्सारी असं अत्याचार करणाऱ्या नराधमाचे नाव आहे. खाडीपार परिसरात राहणारी पीडित अल्पवयीन मुलीच्या  घराच्या शेजारी   असलेल्या आरोपी शाहनवाजचे त्यांच्या नातेवाईकांकडे नेहमी ये-जा असायची. शेजारी असल्याने पीडित मुलीच्या कुटुंबीयांशी त्याची ओळख झाली होती. पीडितेची आई कामानिमित्त 30 डिसेंबर रोजी  घराबाहेर गेली होती. त्याचा फायदा  घेऊन पीडितेच्या घरी येऊन पिण्यासाठी पाण्याची मागणी केली. त्यावेळी पीडितेचा लहान भाऊ, बहीण घरी असल्याने त्यांना पैसे देऊन खाऊ आणण्याच्या बहाण्याने त्यांना लांब असलेल्या दुकानात पाठवले. त्याच वेळी घरात कुणी नसल्याचा फायदा घेऊन जबरदस्ती घरात घुसून अल्पवयीन मुलीवर अत्याचार केला आणि त्यानंतर हा नराधम घरातून पळून गेला. पीडित मुलीने आई घरी येताच आपल्यासोबत घडलेली सर्व माहिती आपल्या आईला सांगितली असता त्यांनी थेट निजामुरा पोलीस ठाणे गाठून आपली कैफियत पोलिसांसमोर मांडली. त्यानंतर पोलिसांनी सापळा लावून आरोपी शाहनवाजच्या मुसक्या आवळून त्याला गजाआड केले आहे. आज त्याला भिवंडी न्यायालयात हजर केले असता 6 जानेवारीपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलीस निरीक्षक (गुन्हे) शंकर इंदलकर करीत आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    Tags: Bhiwandi

    पुढील बातम्या