मुंबईत रे रोड परिसरात गॅस वेल्डिंगच्या दुकानाला आग; 7 दुकानं जळून खाक

मुंबईत रे रोड परिसरात गॅस वेल्डिंगच्या दुकानाला आग; 7 दुकानं जळून खाक

काल रात्री १२.३० वाजता मुंबईतील रे रोड या ठिकाणी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या दुकानाला मोठी आग लागली.

  • Share this:

09 जानेवारी : मुंबईत आग लागण्याचं सत्र सुरूच आहे. काल रात्री १२.३० वाजता मुंबईतील रे रोड या ठिकाणी असलेल्या गॅस वेल्डिंगच्या दुकानाला मोठी आग लागली. त्यामुळे परिसरातील सगळ्यांचाच गोंधळ उडाला आहे. सुदैवानं या आगीत कोणीही जखमी झालेलं नाहीये. या आगीमध्ये आजूबाजूची 7 दुकानं जळून खाक झाली.

अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहचून आगीवर नियंत्रण मिळवलं आहे. मात्र दुकानातील सामान आगीत जळाल्यानं, दुकान मालकाचं मोठं नुकसान झालं आहे. यात कोणतीही जीवित हानी झालेली नाही. पण मुंबईसह महाराष्ट्रात वारंवार आगीच्या घटना घडत असल्यामुळे सुरक्षेचा प्रश्न समोर आला आहे.

रे रोड परीसरात मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकामं आहेत. तसचं मोठ्या संख्येनं बांग्लादेशी घुसखोरांनी बिनदिक्कत झोपड्या देखील बांधल्या गेल्या आहेत. या झोपड्या आगीला निमंत्रण देणाऱ्या तर आहेतच. पण या झोपड्यांची वस्ती नौदलाचा माझगाव डॉक शेजारीच असल्यामुळे राष्ट्रीय सुरक्षेसाठी ही अत्यंत धोकादायक बाब आहे.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Jan 9, 2018 08:38 AM IST

ताज्या बातम्या