औषधीसाठी नव्हते पैसे, पतीने आजारी पत्नीला जमिनीत जिवंत पुरले

औषधीसाठी नव्हते पैसे, पतीने आजारी पत्नीला जमिनीत जिवंत पुरले

उत्तर गोव्यात (North Goa) मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

  • Share this:

पणजी, 6 डिसेंबर: उत्तर गोव्यात (North Goa) मानवतेला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. आजारी पत्नीला उपचार आणि मदतीचा आवश्यकता असताना क्रूर पतीने तिला जिंवत जमिनीत पुरले. गोवा पोलिसांनी आरोपी पतीला आजारी पत्नीची हत्या केल्या प्रकरणी अटक केली आहे.

पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, तुकाराम शेटगांवकर (46) असे आरोपीचे नाव आहे. त्याची पत्नी तन्वी (44) ही आजारी होती. आजारी पत्नीच्या उपचारासाठी तुकारामकडे पैसे नव्हते. आजाराला कंटाळून तुकाराम याने तन्वी हिला बिचोलिम तालुक्यातील नरवेम गावात तिल्लारी सिंचन प्रकल्प परिसरात नेऊत जिंवत जमिनीत पुरले. याप्रकरणी पोलिसांनी आरोपीला गुरुवारी अटक केली. काही मजुरांना तिल्लारी सिंचन प्रकल्प परिसरात खोदकाम करताना महिलेचा मृतदेह सापडला. त्यांनी याबाबत पोलिसांना माहिती दिली. त्यावरून हे प्रकरण उघडकीस आले. तुकाराम याने बुधवारी आजारी पत्नीला जिवंत पुरले होते.

आरोपी तुकाराम मोल मजुरी करून उदरनिर्वाह भागवतो. त्याची पत्नी तन्वी मागील काही दिवसांपासून आजारी होती. तो पत्नीच्या आजाराला कंटाळला होता. पत्नीवर औषधोपचार करण्यासाठीही त्याच्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे तुकारामने तिला जिवंत जमिनीत पुरले. बिचोलिम पोलिसांनी आरोपी तुकाराम विरूद्ध भादंवि. 302 (हत्या) आणि 201 (पुरावा नष्ट करणे) नुसार गुन्हा दाखल केला आहे.

हैदराबाद एन्काऊंटर..

दरम्यान, तेलंगणाची राजधानी हैदराबादमध्ये डॉक्टर तरुणीवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणातील चारही आरोपी एन्काउंटरमध्ये ठार झाले. चौकशीसाठी नेत असताना सर्व आरोपींनी पळून जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी त्यांच्यावर गोळ्या चालवल्या. ही घटना राष्ट्रीय महामार्ग 44 वर घडल्याची माहिती पोलिस आयुक्तांनी दिली आहे. सामूहिक बलात्कारप्रकरणी कोर्टाने सर्व आरोपींना 7 दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली होती. त्यानंतर पोलिस कोठडीत या बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपीने अनेक धक्कादायक खुलासे केले आहेत. 'आम्ही चौघे पीडित महिलेचा मृत्यू झाला आहे, असे समजून तिला जाळण्याचा प्रयत्न करत होतो, तेव्हा ती जिवंत होती,' असे आरोपीने सांगितले होते.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2019 07:42 PM IST

ताज्या बातम्या