मुंबईकरांनो...शनिवारी रात्री 10 नंतर लोकल सेवा बंद! जाणून घ्या विशेष मेगाब्लॉकचा मार्ग

मुंबईकरांनो...शनिवारी रात्री 10 नंतर लोकल सेवा बंद! जाणून घ्या विशेष मेगाब्लॉकचा मार्ग

लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता या मेगाब्लॉकच्या दृष्टीने शनिवारी प्रवासाचं प्लॅनिंग करावं लागणार आहे.

  • Share this:

मुंबई, 7 फेब्रुवारी : लोकल मार्गावरील विविध कामांसाठी अनेकदा रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येतो. मात्र आता शनिवारी रात्रीही एका महत्त्वपूर्ण दुरुस्तीसाठी विशेष मेगाब्लॉकची घोषणा केली आहे. त्यामुळे लोकलने प्रवास करणाऱ्या मुंबईकरांना आता या मेगाब्लॉकच्या दृष्टीने शनिवारी प्रवासाचं प्लॅनिंग करावं लागणार आहे.

फरेरे पुलाचा गर्डर लावण्यासाठी शनिवारी रात्री 10.15 ते रविवारी सकाळी 6.15 वाजेपर्यंत 8 तासांचा विशेष मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. या दरम्यान चर्चगेट ते मुंबई सेन्ट्रल दरम्यान ट्रेन सेवा बंद राहील. 136 लोकल या मुंबई सेंट्रलला थांबतील आणि तिथूनच निघतील.

विशेष मेगाब्लॉक सुरू झाल्यानंतर चर्चगेटहून सुटणारी शेवटची फास्ट लोकल रात्री 10.01 वाजता सुटेल. तसंच चर्चगेटहून सुटणारी शेवटची धीमी लोकल रात्री 9.51 वाजता सुटणार आहे. त्यामुळे तुम्ही या मार्गावरून प्रवास करत असाल तर शनिवारी रात्री 10 पर्यंतच तुम्हाला लोकलची सेवा मिळणार आहे. दरम्यान, या मेगाब्लॉकमुळे वेस्टर्न लाईनवरील काही गाड्या रद्दही करण्यात येतील.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Feb 7, 2020 10:36 PM IST

ताज्या बातम्या