Home /News /mumbai /

सॅल्युट! नाशिकच्या पोलिसाने असं काम केलं की खुद्द गृहमंत्र्यांनी केलं खास कौतुक

सॅल्युट! नाशिकच्या पोलिसाने असं काम केलं की खुद्द गृहमंत्र्यांनी केलं खास कौतुक

सुरक्षा आणि इतर कामांशीवाय मानवतेच्या भूमिकेतून हे पोलीस नागरिकांची अनेक प्रकारे सेवाही करत आहेत.

    मुंबई 20 मे: कोरोना आणि लॉकडाऊनमुळे सगळा देश घुसळून निघाला आहे. सगळे व्यवहार ठप्प असल्याने लाखो मजुरांनी आपल्या घराचा रस्ता धरलाय. महाराष्ट्रातून मजुरांचे जत्थे आपल्या गावाकडे जात आहेत. पुणे, मुंबई, नाशिक या शहरांमधून उत्तर प्रदेश, बिहार, झारखंडमध्ये सर्वात जास्त मजूर जात आहे. अशा लोकांसाठी रस्त्यात एकमेव आधार म्हणजे रस्त्यावर गस्त घालणारे पोलीस. सुरक्षा आणि इतर कामांशीवाय मानवतेच्या भूमिकेतून हे पोलीस नागरिकांची अनेक प्रकारे सेवाही करत आहेत. अशाच एका पोलिसाचं कौतुक खुद्द राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केलंय. नाशिकच्या ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये असलेले जवान सतिश चव्हाण हे कसारा घाटात तैनात आहेत. याच मार्गावर स्थलांतरीत मजूर मोठ्या प्रमाणावर मिळेत त्या मार्गाने घराकडे जात आहेत. अशाच अनेक मजुरांचे बिघडलेले ऑटो दुरुस्त करून देण्याचं काम सतिश चव्हाण हे जवान करत आहे. चव्हाण यांना गाड्या दुरुस्त करणं आणि तांत्रिक गोष्टींची आवड आहे. आपल्या ड्युटीसोबतच या कौशल्याचा वापर करून ते लोकांची मदत करत आहेत. लॉकडाऊनमुळे सगळं ठप्प असल्याने वाहन चालकांना गरज पडली तर मोठ्या संकटला सामोरे जावं लागतं. आणि मदत मिळणं हे दुरापास्त आहे. अशा परिस्थितीत सतिश चव्हाणांसारखे पोलीस हे देवदूतच ठरले आहेत. मुंबईत कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. सर्वसामान्यांसह कर्तृव्य बजावत असताना पोलिसांनाही कोरोनाची लागण झाल्याची बाबसमोर आली आहे. परंतु, आता मुंबई एका महिला आयएएस अधिकारी आणि तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाल्याची घटना समोर आली आहे. मुंबईतील मंत्रालयाजवळील 'यशोधन' इमारत ही शासकीय आयएएस आणि आयपीएस अधिकाऱ्यांचं निवासस्थान आहे. या इमारतीमध्ये राहणाऱ्या आयएएस महिला अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाल्याचं निष्पन्न आलं आहे. हेही वाचा -बापरे! परवानगीला लागले तब्बल 5 दिवस, नातेवाईकांना ताब्यात मिळाला कुजलेला मृतदेह या महिलेच्या संपर्कात आल्यामुळे आयपीएस असलेल्या तिच्या पतीलाही कोरोनाची लागण झाली. दोघांचेही रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहे. त्यामुळे पालिकेच्या आरोग्य कर्मचाऱ्यांनी कोरोनाबाधित अधिकारी इमारतीच्या ज्या मजल्यावर राहत होते, तो मजला पूर्णपणे सील केला आहे.
    Published by:Priyanka Gawde
    First published:

    पुढील बातम्या