धक्कादायक: सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला पोलिसांनीच केली मारहाण

धक्कादायक: सरकारी हॉस्पिटलमधील कर्मचाऱ्याला पोलिसांनीच केली मारहाण

मी रुग्णालयाचा कर्मचारी असे सांगून सुद्धा पोलिसांनी मला खाली पाडून बेदम मारहाण केल्याचा आरोप सतीश वाघ यांनी केला आहे.

  • Share this:

उल्हासनगर 04 मे: कोरोनाविरुद्धच्या लढाईल आरोग्य कर्मचारी आणि पोलीस हे आघाडीवर लढत आहेत. त्यांच्यावर हात उगारण्याचं धाडस कुणी करू नये अशी तंबी सरकारने दिली आहे. मात्र उल्हासनगरमध्ये शासकीय मध्यवर्ती रुग्णालयातील कर्मचाऱ्याला पोलिसांनी मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

सतीश वाघ असे मारहाण करण्यात आलेल्या कर्मचाऱ्याचे नाव आहे. वाघ हे शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात सोशल सर्व्हिस सुप्रिटंडन म्हणून कार्यरत आहेत. परराज्यात जाणाऱ्या मजुरांची वैद्यकीय तपासणीसाठी आज शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात मोठी गर्दी झाली होती. या मजुरांना तपासणी केल्यावर जे सर्टिफिकेट द्यायचे होते. त्यावर देण्यासाठी रुग्णालयाच्या नावाचा रबर स्टॅम्प नव्हता, तो बनवण्याच्या कामासाठी वाघ रूग्णालयाच्या आवरात पार्क केलेली दुचाकी घेऊन  गेले आणि काम झाल्यावर पुन्हा त्याच ठिकाणी दुचाकी पार्क केली.

मात्र यावेळी त्या ठिकाणी कर्तव्यावर असलेल्या मध्यवर्ती पोलीस ठाण्याच्या पोलिसांनी वाघ यांना पार्क केलेली दुचाकी त्या ठिकानाहून काढण्यास सांगितली. मात्र मी रुग्णालयाचा कर्मचारी असे सांगून सुद्धा पोलिसांनी मला खाली पाडून बेदम  मारहाण केल्याचा आरोप सतीश वाघ यांनी केला आहे.

दरम्यान त्याच्या अंगावर मारहाणीचे वळ उमटले असून मध्यवर्ती रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

हे वाचा - VIDEO दुःखाचे नव्हे, हे अश्रू आनंदाचे; कोविड योद्ध्या महिलेचं झालं अनोखं स्वागत

या प्रकरणी वाघ हे पोलीस यांनी मध्यवर्ती पोलीस ठाण्यात तक्रारीचा अर्ज दिला असून शासकीय कामात अडथळा आणल्या प्रकरणी संबंधित पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. आमच्या प्रतिनिधींनी जेव्हा पोलिसांची बाजू जाणून घेण्याचा प्रयत्न केला असता यात मारहाण झाली नसून गैरसमजुतीतुन हा प्रकार घडला असून धक्काबुक्की  झाल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्याने सांगितले आहे.

हेही वाचा -

कोरोनाच्या संकटात कशी पार पडणार आषाढी वारी? अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष

फेलोशिपमधून शिक्षण घेतलेल्या इरफानने मृत्यूनंतर मागे ठेवली इतकी संपत्ती

 

 

 

First published: May 4, 2020, 9:10 PM IST

ताज्या बातम्या